नितीन गडकरींची घोषणा, नागपूर-पुणे प्रवास आता होणार आठ तासांत!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 02:58 PM2022-10-30T14:58:39+5:302022-10-30T15:00:16+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुणे-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केलीये.
सुरभी शिरपूरकर
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुणे-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी एक महत्त्वाची घोषणा केलीये. पुणे-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाला नवीन मार्ग जोडणार असल्याची गडकरी यांनी ट्वीट करून सांगितलं. पुणे-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी नवा मार्ग बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्गाला जोडण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केली. एक्स्प्रेस वे जोडणीमुळे पुण्यावरून नागपूरला किंवा नागपूरवरून पुण्याला आठ तासांत पोहोचणं शक्य होईल, असं नितीन गडकरींनी म्हटलंय.
सध्या मुंबई नागपूर ला जोडणारा आणि महाराष्ट्रातील या दोन्ही महत्त्वाच्या शहराला जोडणारा बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग चांगलाच चर्चेत आहे. यातच आता पुणे-नागपूर प्रवासातील वेळ कमी करण्यासाठी समृद्धी महामार्गाला नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे. नागपूर-पुणे अंतर कमी करण्यासाठी पुणे ते छत्रपती संभाजीनगर असा नवा मार्ग तयार केला जाणार आहे. पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस वे तयार करून तो औरंगाबादजवळ समृद्धी मार्गाला जोडला जाईल.
नागपूर ते पुणे प्रवास आठ तासात होणार शक्य!
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) October 30, 2022
सद्यस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगरजवळ नवीन प्रस्तावित पुणे - संभाजीनगर (औरंगाबाद) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस-वे नी जोडण्यात येईल. pic.twitter.com/dX9EtRnmEj
या महामार्गामुळे पुणे ते औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रवास अडीच तासांत आणि पुढे समृद्धी महामार्गावरून नागपूर-औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) प्रवास साडेपाच तासांत करणं शक्य होणार आहे. त्यामुळे नागपूर ते पुणे प्रवासासाठी हा मार्ग झाल्यानंतर आठ तासांचाच कालावधी लागेल, असं गडकरींनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या या ट्वीट नंतर चर्चेला उधाण आलंय. अनेकांनी या घोषणेचं स्वागत केलं तर काहींनी समृद्धी महामार्गद्वारे नागपूर मुंबई प्रवास सुरु होणार होता त्याचं काय झालं असा प्रश्न उपस्थिती केलाय.