रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी बुटीबोरीत भरपूर जमीन उपलब्ध; गडकरींचे पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2022 10:32 AM2022-02-19T10:32:13+5:302022-02-19T12:57:08+5:30

गडकरी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांना पत्र पाठवून या प्रकल्पासाठी बुटीबोरी येथे भरपूर जमीन उपलब्ध असल्याचे कळविले आहे.

nitin gadkari's letter to petroleum minister about land availability for refinery and petrochemical complex | रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी बुटीबोरीत भरपूर जमीन उपलब्ध; गडकरींचे पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र

रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी बुटीबोरीत भरपूर जमीन उपलब्ध; गडकरींचे पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र

Next
ठळक मुद्देलोकमतने केला पाठपुरावा

नागपूर : गेली आठ महिने रिफायनरी व पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी कुठल्याही हालचाली झाल्या नसताना आता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला आहे. गडकरी यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांना पत्र पाठवून या प्रकल्पासाठी बुटीबोरी येथे भरपूर जमीन उपलब्ध असल्याचे कळविले आहे.

रत्नागिरीच्या राजापूर येथे प्रस्तावित हा प्रकल्प जागेच्या फेऱ्यात अडकला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी मुबलक जमीन उपलब्ध असलेला विदर्भ हा चांगला पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, तत्कालिन पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २९ जून रोजी विदर्भ पेट्रोकेमिकल कॉम्पलेक्स उभारण्याची घोषणा केली होती. या घोषणेला आठ महिने होऊनही आजवर टेक्नो फिजिबिलिटी (व्यावहारिकता) तपासण्यासाठी एजन्सी नियुक्त झालेली नाही.

लोकमतने वृत्त प्रकाशित करत याकडे लक्ष वेधले होते. आता गडकरींनी याची दखल घेत या प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रिफायनरीसह पेट्रोकेमिकल काॅम्प्लेक्स नागपुरातच स्थापन करण्यासाठी आग्रह धरला आहे. नागपूर हे देशाच्या मध्यभागी आहे. रस्ते व हवाई मार्गाने संपूर्ण देशाशी जोडले गेले आहे. बुटीबोरी एमआयडीसीमध्ये हजारो एकर जमीन उपलब्ध आहे. गोसीखुर्द प्रकल्पातून येथे मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या ५ लाख लोकांना रोजगार मिळेल, अशी बाजूही गडकरी यांनी पेट्रोलियममंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात मांडली आहे.

राष्ट्रीय महामार्ग, समृद्धी महामार्गाशेजारी पाईपलाईन

- गडकरी यांनी पत्रात रिफायनरीची शिफारस केली आहे. रिफायनरीची पाईपलाईन टाकण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांचा उपयोग केला जाऊ शकतो.

नागपूर - मुंबई समृद्धी महामार्ग देखील उपलब्ध आहे. सिंदी येथे उभारण्यात आलेल्या ड्राय पोर्टचा देखील या प्रकल्पासाठी फायदा होईल, असेही गडकरी यांनी पत्रात नमूद केले आहे.

Web Title: nitin gadkari's letter to petroleum minister about land availability for refinery and petrochemical complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.