निवडणूक याचिका खारीज करण्याची नितीन गडकरी यांची विनंती अमान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:10 AM2021-02-27T04:10:18+5:302021-02-27T04:10:18+5:30
नितीन गडकरी यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सहाव्या ऑर्डरमधील नियम १६ अंतर्गत एक अर्ज दाखल करून मो. नफिस खान यांच्या ...
नितीन गडकरी यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सहाव्या ऑर्डरमधील नियम १६ अंतर्गत एक अर्ज दाखल करून मो. नफिस खान यांच्या निवडणूक याचिकेतील अनावश्यक, निंदनीय व आधारहीन मुद्दे वगळण्याची विनंती केली होती. उच्च न्यायालयाने तो अर्ज अंशत: मंजूर करून निवडणूक याचिकेतील विविध आधारहीन मुद्दे वगळण्याचा आदेश खान यांना दिला. परिणामी, गडकरी यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.
---------------
पुढील सुनावणी उर्वरित मुद्यांवर
नितीन गडकरी यांनी खान यांना ही निवडणूक याचिका दाखल करण्याचा अधिकार नाही असा मुद्दा मांडून ही याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारीज करण्यासाठी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम ११ (ए) अंतर्गतही अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता तो अर्ज खारीज केला व सदर याचिकेवर वगळलेले निराधार मुद्दे सोडून उर्वरित मुद्यांवर पुढील सुनावणी घेतली जाईल असे स्पष्ट केले.