Nitin Gadkari's Birthday : वाढदिवसानिमित्त नितीन गडकरींनी केला 'हा' खास संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2022 12:26 PM2022-05-27T12:26:49+5:302022-05-27T13:07:16+5:30

Nitin Gadkari's Birthday : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आज वाढदिवस आहे. देशभरातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांनी एक खास संकल्प केला आहे.

Nitin Gadkari's resolution on the occasion of his birthday To Contribute In Mission Amrit Sarovar | Nitin Gadkari's Birthday : वाढदिवसानिमित्त नितीन गडकरींनी केला 'हा' खास संकल्प

Nitin Gadkari's Birthday : वाढदिवसानिमित्त नितीन गडकरींनी केला 'हा' खास संकल्प

Next

नागपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा आज ६५ वा वाढदिवस. देशभरातील सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते नितीन गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे. नागपुरातील त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते, मित्रपरिवार व शुभेच्छुकांची रांग लागली आहे. सोशल मीडियावरून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. वाढदिवसानिमित्त गडकरींनी एक खास संकल्प केला असून ७५ हजार अमृत सरोवर तयार करण्याचा प्रयत्न असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

वाढदिवसानिमित्त मिळालेल्या शुभेच्छा व प्रेम याबाद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. देशसेवेसाठी कार्य करत राहायचे आहे. शोषित, पीडित, दुबळे, आर्थिक विकासापासून दुरावलेल्या लोकांसाठी अधिकाधिक काम करण्यासाठी निरंतर कार्य करत राहील असे भाव त्यांनी व्यक्त केले. यासह, स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित ठेवून जेवढं काम करता येईल तेवढं केलं पाहिजे. ते प्रयत्न मी सतत करत राहील, असेही ते म्हणाले.

देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींद्वारे सुरू करण्यात आलेल्या अमृत सरोवर योजनेअंतर्गत २० सरोवरांचं उद्या उद्धाटन करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत वर्षभरात ७५ हजार अमृत सरोवर तयार करणार आणि पंतप्रधानांच्या या मोहिमेत मदत करणार व त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न करु, असंही गडकरींनी सांगितलं.

संजय राऊतांनी दिल्या शुभेच्छा

शिवसेना नेते संजय राऊत यांनी नितीन गडकरी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली आहेत. विकासाची दृष्टी असलेला आणि विकासाआड राजकारण न आणणारा राष्ट्रीय स्तरावर शरद पवार यांच्यानंतर जर कोणी नेता असेल तर तो म्हणजे नितीन गडकरी, असे कौतुकोद्गार संजय राऊत यांनी काढले.

नितीन गडकरी हे महाराष्ट्राचे आहेत, म्हणून मला त्यांचा सदैव अभिमान आहे, देशाच्या विकासामध्ये महाराष्ट्राचे योगदान काय, हे नितीन गडकरी यांनी केलेल्या गेल्या सात वर्षांतील कामांमधून आपल्याला दिसून येईल. नितीन गडकरी हे जरी भारतीय जनता पक्षाचे नेते असले, तरी देशातील प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक नेता हा त्यांचा चाहता आहे, गडकरींच्या टीकाटिपणीमध्ये कधी विखार नसतो, ते स्वभावाने फटकळ आहेत, पण मनाने निर्मळ आहेत, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

Web Title: Nitin Gadkari's resolution on the occasion of his birthday To Contribute In Mission Amrit Sarovar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.