नितीन नखाते सैतवाल जैन संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:08 AM2021-05-20T04:08:57+5:302021-05-20T04:08:57+5:30

नागपूर : अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी नितीन नखाते यांच्याकडे आली आहे. संस्थेच्या ऑनलाईन सभेत राष्ट्रीय ...

Nitin Nakhate as the National Vice President of Saitwal Jain Society | नितीन नखाते सैतवाल जैन संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी

नितीन नखाते सैतवाल जैन संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी

googlenewsNext

नागपूर : अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्थेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी नितीन नखाते यांच्याकडे आली आहे. संस्थेच्या ऑनलाईन सभेत राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांचे नाव राष्ट्रीय महामंत्री मुकुंद वालचाले यांनी मांडले. कोषाध्यक्ष विजयकुमार लुंगाडे यांनी अनुमोदन दिले. एकमताने राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे यांनी नखाते यांच्या नावाची घोषणा केली.

नितीन नखाते हे श्री भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, दिगंबर जैन महासमिती, महावीर युथ क्लब, गुप्तिनंदी गुरुभक्त परिवार, धर्मतीर्थ विकास समिती इत्यादी संस्थांशी जुळले आहेत. २०१८ साली नागपुरात आचार्यश्री गुप्तिनंदीजी गुरुदेव यांच्या चातुर्मास समितीच्या मुख्य संयोजकपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे विदर्भ (पूर्व) उपाध्यक्ष प्रकाश मारवडकर, सचिव राजेंद्र नखाते, नागपूरचे (पश्चिम) अध्यक्ष श्रीकांत धोपाडे, सचिव अरविंद हनवंते, नागपूरचे (पूर्व) अध्यक्ष श्रीकांत तुपकर, सचिव उमेश फुलंबरकर, श्री पार्श्वप्रभू दिगंबर सैतवाल जैन मंदिर संस्थेचे अध्यक्ष दिलीप शिवणकर, महामंत्री दिलीप राखे, आनंदराव सवाने, पुलक मंच परिवारचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मनोज बंड, शरद मचाले, विशाल चाणेकर, गौरव अवथनकर, विनय सावलकर, प्रशांत भुसारी, प्रशांत सवाने, जगदीश गिल्लरकर, मुन्ना काटोलकर, डॉ. रवींद्र भुसारी, पपीश कहाते, ऋषभ आगरकर, दिनेश सावलकर, प्रशांत मानेकर, मनीष पिंजरकर, बाहुबली पलसापुरे, प्रदीप तुपकर, अमोल भुसारी यांनी अभिनंदन

केले आहे.

Web Title: Nitin Nakhate as the National Vice President of Saitwal Jain Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.