भारत जोडो यात्रेत नितीन राऊत जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2022 10:50 PM2022-11-01T22:50:25+5:302022-11-01T22:50:51+5:30
Nagpur News भारत जोडो यात्रेत हैदराबाद येथे सहभागी झाले असताना माजी मंत्री नितीन राऊत यांना कुणाचा तरी धक्का लागला व तोल जाऊन ते खाली पडले.
नागपूर : भारत जोडो यात्रेत हैदराबाद येथे सहभागी झाले असताना माजी मंत्री नितीन राऊत यांना कुणाचा तरी धक्का लागला व तोल जाऊन ते खाली पडले. यामुळे त्यांचा डावा डोळा जखमी झाला असून, त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथील इस्पितळात दाखल करण्यात आले.
राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालत असताना कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी होती. या गर्दीतून मार्ग काढत प्रत्येक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते. अशाच प्रयत्नात कुणाचा तरी राऊत यांना धक्का लागला.