नागपुरात वाचनालयाच्या लोकार्पणप्रसंगी नितीन राऊत समर्थक भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:23 PM2019-08-17T12:23:26+5:302019-08-17T13:37:08+5:30
लष्करीबाग येथील बाजीराव साखरे वाचनालयाच्या लोकार्पण प्रसंगी आ. मिलिंद माने, महापौर नंदा जिचकार यांच्या समोर नितीन राऊत समर्थकांनी शनिवारी सकाळी गोंधळ घातला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: उत्तर नागपुरातील लष्करीबाग येथील आवळबाबू चौक येथील बाजीराव साखरे वाचनालय (ई-ग्रंथालय)चे बांधकाम माजी मंत्री नितीन राऊ त यांच्या आमदार निधीतून करण्यात आले होते. परंतु संगणक व पुस्तके उपलब्ध न झाल्याने काम अर्धवट होते. काँगे्रसचे नगरसेवक संदीप सहारे यांच्या यांच्या प्रयत्नांनी वाचनालसाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात ५० कोटींची तरतूद करण्यात आली. अगामी विधानसभा निवडणुका विचारात घेता महापालिकेतर्फे शनिवारी भाजपाचे आमदार डॉ. मिलींद माने यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. मात्र कार्यक्रम पत्रिकेवर नितीन राऊ त यांचे नाव नसल्याने तसेच त्यांना कार्यक्रमासाठी निमंत्रित न केल्याने राऊ त यांच्या समर्थकांनी कार्यक्रमात नारेबाजी करून गोंधळ घातला.
नितीन राऊ त मंत्री असताना शासकीय निधीतून लष्करीबाग येथील २२०७.१० चौरस मीटर जागेमध्ये बाजीराव साखरे वाचनालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. वाचनालयाची इमारत तीन मजली असून या ठिकाणी मुले व मुलींच्या अभ्यासाकरीता स्वतंत्र कक्ष , केंद्रीय लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग व इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरीता स्वतंत्र कक्षासह दोन स्वतंत्र संगणक कक्षाची व्यवस्था येथे करण्यात आली होती. मात्र निधी अभावी काम अर्धवट असल्याने मागील काही वर्षापासून वाचनालयाचे लोकार्पन रखडले होते. संदीप सहारे यांनी महापालिकेकडे यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार ५० लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला. यातून सुविधा उपलब्ध झाल्यानंतर लोकार्पण करण्यात आले. काँग्रेस कार्यक र्त्यांच्या विरोधाला न जुमानता वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी भाजपाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.