मनपा  प्रशासन, पदाधिकाऱ्यांना मुंढे यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 12:10 AM2020-01-26T00:10:37+5:302020-01-26T00:12:42+5:30

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची बातमी येताच दुसऱ्या दिवसापासून अधिकारी, कर्मचारी वेळेवर कार्यालयात येऊ लागले आहेत. भाजपाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये मुंढे यांच्याबाबत अस्वस्थता पसरली आहे.

NMC administration, office bearers await Mundhe | मनपा  प्रशासन, पदाधिकाऱ्यांना मुंढे यांची प्रतीक्षा

मनपा  प्रशासन, पदाधिकाऱ्यांना मुंढे यांची प्रतीक्षा

Next
ठळक मुद्देसोमवारी पदभार स्वीकारण्याची शक्यता : रविभवनात थांबणार आयुक्त मुंढे

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीची बातमी येताच दुसऱ्या दिवसापासून अधिकारी, कर्मचारी वेळेवर कार्यालयात येऊ लागले आहेत. भाजपाचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये मुंढे यांच्याबाबत अस्वस्थता पसरली आहे. सर्वजण आपसात चर्चा करून त्यांच्या स्वभावाबाबत चौकशी करीत आहेत. दरम्यान सत्तापक्षाने नासुप्रचे मनपात विलिनीकरणाचा मुद्दा घेऊन विशेष सभा बोलाविल्यामुळे त्यांचे स्वागत महापालिका सदनात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सूत्रांनुसार मुंढे सध्या रविभवनात थांबणार आहेत. याबाबत महापालिका आयुक्तांच्या सचिवांनी शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहुन रविभवनात मुंढे यांच्यासाठी एक खोली राखीव ठेवण्यास सांगितले आहे. २५ जानेवारी २०२० पासून खोली आरक्षित ठेवण्यास म्हटले आहे. सोबतच पत्रात २७ जानेवारी २०२० रोजी मुंढे पदभार स्वीकारणार असल्याचा उल्लेख आहे. शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या रुपाने ओळखल्या जाणाऱ्या मुंढे यांच्या येण्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काहीजण आपल्या सेवानिवृत्तीची तारीख सांगत आहेत तर भाजपा नगरसेवकांमध्ये मुंढे दीड ते दोन डझन भाजपा नगरसेवकांची यादी घेऊन येत असल्याची चर्चा आहे. त्यांच्याशी निगडित प्रकल्प व त्यांच्या हालचालींवर नजर ठेवणार आहेत. काहींच्या मते आयएएस अधिकारी कुणाचे ऐकत नाहीत. त्यामुळे यादी घेऊन येणे किंवा टार्गेट ठरवून काम करण्याची शक्यता नाही. त्यांच्या कामाची वेगळी शैली आहे. त्यात त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेत बदल घडून येणार आहे.

बांगर यांच्या कामाची स्तुती
अभिजित बांगर यांनी ज्या पद्धतीने महापालिका आयुक्त असताना प्रशासन आणि सत्तापक्षाला सोबत घेऊन काम केले, त्याच चर्चा सत्तापक्ष तसेच विरोधी पक्षात होत आहे. नगरसेवकांच्या मते त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करू द्यायला हवा होता. त्यांच्यामुळे स्वच्छतेच्या रँकिंगमध्ये नागपूर पुढे जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनुसार बांगर आपल्या बदलीमुळे नाराज आहेत. त्यांना नव्या ठिकाणी नेमणूक मिळाली नाही. शुक्रवारी दिवसभर बांगर शहरात होते. अनेक अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी त्यांना फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु संपर्क झाला नाही. ते महापालिका मुख्यालयातही आले नाही. बैठकीसाठी ते ताप असला तरी कार्यालयात येत होते.

Web Title: NMC administration, office bearers await Mundhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.