मनपाच्या कर्मचाºयांनी घेतली भ्रष्टाचारविरोधी शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:21 AM2017-10-31T00:21:59+5:302017-10-31T00:22:19+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह राबविला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह राबविला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांनी महापालिकेचे कर्मचारी व अधिकाºयांना भ्रष्टाचारविरोधी शपथ दिली. महापालिकेचे उपायुक्त रवींद्र देवतळे, डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त महेश धामेचा प्रामुख्याने उपस्थित होते.
भ्रष्टाचार विरोधात जनमोहीम कशी राबविता येईल, तसेच भ्रष्टाचार करणे अथवा लाच मागणे किंवा स्वीकारणे यासंदर्भातील तक्रार कोठे करावयाची याची माहिती तोतरे यांनी दिली.
काम करताना कुठलीही तक्रार असेल अथवा भ्रष्टाचाराविरोधी काही तक्रारी करण्यासाठी १०६४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत महेश धामेचा यांनी केले. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. यावेळी अधिकारी व कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.