मनपा प्रभाग क्रमांक १२ (ड) पोटनिवडणूक : ग्वालबंशी, शुक्ला यांच्यासह सात उमेदवारांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 08:42 PM2019-12-23T20:42:04+5:302019-12-23T20:46:17+5:30
नागपूर महापालिकेच्या धरपमेठ झोन अंतर्गत प्रभाग १२ (ड) या रिक्त झालेल्या एका जागेसाठी ९ जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेच्या धरपमेठ झोन अंतर्गत प्रभाग १२ (ड) या रिक्त झालेल्या एका जागेसाठी ९ जानेवारीला पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची सोमवारी शेवटची तारीख होती. या निडणुकीसाठी भाजपचे , विक्रम जगदीश ग्वालबंशी व काँग्रेसचे पंकज सुरेंद्र शुक्ला यांच्यासह सात उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
काही महिन्यापूर्वी भाजपचे नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांचे निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या प्रभाग १२ (ड) येथील जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. १६ ते २३ डिसेंबरदरम्यान नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी कालावधी सात उमेदवारी अर्ज आले आहेत. यात
अशोक देवराव डोर्लिकर (अपक्ष), विक्रम जगदीश ग्वालबंशी (भारतीय जनता पार्टी), आकाश सुरेश कावळे (आम आदमी पार्टी), पंकज सुरेंद्र शुक्ला (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), रिजवान नसीर खान (काँग्रेस), प्रफुल देवराव गणवीर (भारिप बहुजन महासंघ), युगलकिशोर केसरलालजी विदावत (अपक्ष) यांनी नामनिर्देशनपत्र सादर केले. सर्व उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनपा उपायुक्त निर्भय जैन यांच्याकडे नामनिर्देशनपत्र सादर केले. आज मंगळवारी नामनिर्देशनपत्रांची छाननी केली केली जाणार आहे. भाजप व काँग्रेस उमेदवारांत थेट लढत होण्याची शक्यता आहे.
विक्रम ग्वालबंशी यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महापौर संदीप जोशी, आ. परिणय फुके, मायाताई इवनाते, माजी आ. सुधाकर देशमुख, भाजपचे शहर अध्यक्ष प्रवीण दटके, सत्तापक्षनेते संदीप जाधव, दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, किशन गावंडे, किशोर पालांदूरकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूक वेळापत्रक
नामनिर्देशन पत्र छाननी - २४ डिसेंबर
वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध - २४ डिसेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेणे - २६ डिसेंबर
उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप - २७ डिसेंबर
उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध - २७ डिसेंबर
मतदान दिनांक - ९ जानेवारी २०२०
मतमोजणी - १० जानेवारी २०२०