मनपाचे कर संग्राहक बडतर्फ : ९३ लाख रुपयाचा अपहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 12:18 AM2020-02-15T00:18:12+5:302020-02-15T00:18:30+5:30
महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष्मीनगर झोनचे निलंबित कर संग्राहक आनंद लक्ष्मणराव फुलझेले यांना ९३ लाख रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी मनपाच्या सेवेतून बडतर्फ केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लक्ष्मीनगर झोनचे निलंबित कर संग्राहक आनंद लक्ष्मणराव फुलझेले यांना ९३ लाख रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी मनपाच्या सेवेतून बडतर्फ केले.
आनंद फुलझेले यांनी मालमत्ता कराच्या स्वरुपात करदात्यांकडून आर्थिक वर्ष २०१४-१५, २०१५-१६ आणि २०१६-१७ या काळात ९३ लाख रूपये वसूल केले आणि त्यांना पावतीसुध्दा दिली परंतु त्यांनी ही रक्कम महानगरपालिकेच्या फंडात जमा केली नाही आणि पावत्याही रद्द करुन टाकल्या त्यांनी २००२ ते २००७ च्या दरम्यान सुध्दा १५ लाख रुपयाचा अपहार केला होता. त्यासाठी त्यांना निलंबित करून विभागीय चौकशी करण्यात आली होती. चौकशीअंती त्यांच्यावर लावलेले आरोप सिध्द झाले त्यामुळे म.न.पा. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याच्या कलम ५६ अन्वये त्यांना सेवेतून बडतर्फ केले. आता त्यांना कोणत्याही प्रकारचा सेवेचा आर्थिक लाभ मिळणार नाही.