मनपा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना पराभूतांच्या धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 10:37 PM2019-02-19T22:37:49+5:302019-02-19T22:38:38+5:30

सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी व सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य मागण्यासंदर्भात महापालिका मुख्यालयात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन का गेला आणि मुंडण आंदोलन स्थगित का केले असा सवाल करून लोकक्रांती पॅनेलच्या पराभूत उमेदवारांनी महापालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवरच शिवीगाळ करून धमक्या दिल्या. हा प्रकार घडला तेव्हा महिला पदाधिकारीसुद्धा उपस्थित होत्या. गोंधळामुळे बैठकीत ठोस निर्णय झाला नाही.

NMC teacher union's office bearers threaten by defeated | मनपा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना पराभूतांच्या धमक्या

मनपा शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना पराभूतांच्या धमक्या

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे गेल्याचा राग काढला : लोकक्रांतीच्या पराभूत उमेदवारांची शिवीगाळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी व सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अन्य मागण्यासंदर्भात महापालिका मुख्यालयात मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन का गेला आणि मुंडण आंदोलन स्थगित का केले असा सवाल करून लोकक्रांती पॅनेलच्या पराभूत उमेदवारांनी महापालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष तसेच इतर पदाधिकाऱ्यांनी मनपा मुख्यालयाच्या हिरवळीवरच शिवीगाळ करून धमक्या दिल्या. हा प्रकार घडला तेव्हा महिला पदाधिकारीसुद्धा उपस्थित होत्या. गोंधळामुळे बैठकीत ठोस निर्णय झाला नाही.
सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी आणि सातवा वेतन आयोग लागू करावा याकरिता महापालिका शिक्षक संघाने मुंडण आंदोलन केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना चचेंसाठी बोलावले आणि सर्व मागण्या निवडणुकीपूर्वी मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. तसे पत्रकही संघाचे अध्यक्ष राजेश गवरे यांना दिले होते. यानंतर मुंडण आंदोलन स्थगित करण्यात आले होते. या दरम्यान मनपा शिक्षक संघाची निवडणूक पार पडली. सत्ताधाऱ्यांचा लोकक्रांती पॅनेलचा यात पराभव झाला. मनपा शिक्षक आघाडीने विजयाची हॅटट्रिक साधली. यामुळे चिडलेल्या लोकक्रांतीच्या उमेदवारांनी शिवीगाळ व धमक्या देऊन आपला रोष व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार मंगळवारी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात महापालिकेत अधिकारी व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी महापौर नंदा जिचकार, सत्तापक्षनेते संदीप जोशी,महापालिका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश गवरे व इतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे व पदाधिकारी उपस्थित होते. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देणे, सातवा वेतन लागू करणे या दोन प्रमुख मागण्यांवर बैठकीत चर्चा झाली. महापौरांनी आचारसंहितेपूर्वी आर्थिक तरतूद करून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. मात्र काही कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींनी वेगळा सूर लावला. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी नंतर बघू आधी सातवा वेतन आयोग लागू करा, अशी मागणी केली. मागण्यांसर्भात कर्मचाऱ्यांमध्येच मतभेद असल्याने प्रशासनाने बैठक गुंडाळली
मुंडण आंदोलन करणार
त्यानंतर राजेश गवरे यांच्या नेतृत्वात मुख्यालयाच्या हिरवळीवर शिक्षक कर्मचारी समन्वय समितीची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी लेखी हमी दिल्यानंतरही महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्यास टाळाटाळ करीत असल्याने स्थगित केलेले मुंडण आंदोलन आणि एक दिवसांचा लाक्षणिक संप २७ फेब्रुवारीला करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: NMC teacher union's office bearers threaten by defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.