दोन आठवड्यापासून एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:12 AM2021-08-26T04:12:02+5:302021-08-26T04:12:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनामुळे मागील दोन आठवड्यापासून नागपूर जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी ...

No deaths in two weeks | दोन आठवड्यापासून एकही मृत्यू नाही

दोन आठवड्यापासून एकही मृत्यू नाही

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनामुळे मागील दोन आठवड्यापासून नागपूर जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी जिल्ह्यातील नव्या बाधितांची संख्या तीनने घटली व चार नवे रुग्ण नोंदविण्यात आले. ग्रामीण भागात परत एकही बाधित आढळला नाही.

बुधवारच्या अहवालानुसार, २४ तासात ३ हजार ८८३ चाचण्या झाल्या. त्यातील २ हजार ७२७ चाचण्या शहरी तर, १ हजार १५६ चाचण्या ग्रामीण भागात झाल्या. शहरात तीन तर जिल्हाबाहेरील एक रुग्ण आढळला.

जिल्ह्यात एकूण बाधितांची ४ लाख ९३ हजार इतकी झाली आहे. यात शहरातील ३ लाख ४० हजार ५९ तर ग्रामीणमधील १ लाख ४६ हजार १२४ रुग्णांचा समावेश आहे. मृत्यूसंख्या १० हजार ११८ वर स्थिर आहे. यात शहरातील ५ हजार ८९३ मृत्यूचा समावेश आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाचे ७५ सक्रिय रुग्ण आहेत. यात ग्रामीणमधील तीन व शहरातील ७१ रुग्णांचा समावेश आहे. ५० रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाची बुधवारची स्थिती

दैनिक चाचण्या : ३,८८३

शहर : ४ रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू

एकूण बाधित रुग्ण : ४,९३,०००

एकूण सक्रिय रुग्ण : ७५

एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८२,८०७

एकूण मृत्यू : १०,११८

Web Title: No deaths in two weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.