घोषणेला सहा वर्षे झाली तर 'नंदग्राम'चे गोकूळ सुने-सुने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 11:13 AM2022-11-22T11:13:31+5:302022-11-22T11:14:01+5:30

नागपूर मनपाला अजूनही १०४ कोटींच्या निधीची प्रतीक्षा

No decision on Nandagram project for six years; Nagpur Municipal Corporation is still waiting for funds of 104 crores | घोषणेला सहा वर्षे झाली तर 'नंदग्राम'चे गोकूळ सुने-सुने

घोषणेला सहा वर्षे झाली तर 'नंदग्राम'चे गोकूळ सुने-सुने

Next

राजीव सिंह

नागपूर : पशुपालकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने नागपूर महापालिकेने २०१६ मध्ये नंदग्राम पशुनिवारा केंद्र साकार करण्याचा निर्णय घेतला होता. सहा वर्षांनंतरही हा प्रकल्प फायलीतच दडलाय. आता या प्रकल्पाची किंमत १०४.९० कोटींवर पोहोचली आहे. या प्रकल्पाला निधी मिळावा म्हणून महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी १७ फेब्रुवारी २०२२ ला नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवून मागणी केली होती. परंतु, या प्रकल्पावर कुणीच चर्चा करण्याच्या तयारीत नाही.

कोरोनाच्या दोन वर्षांनंतर डिसेंबरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. रस्त्यावर मोकाट फिरणारे पशू व शहराला गोठामुक्त करण्यासाठी या प्रकल्पाची अत्यंत आवश्यकता आहे. सोमवारी मंत्रालयात नागपुरातील विषयासंदर्भात चर्चा झाली. या प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली; परंतु निधीची तरतूद नसल्याने विषय लगेच थांबविण्यात आला. माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहराला गोठामुक्त करण्यासाठी या प्रकल्पाची संकल्पना मांडली होती.

नंदग्राम प्रकल्पाचे प्रारूप आर्किटेक पाटील यांनी तयार केले होते. यात रस्ते, सुरक्षाभिंत, मुख्य द्वार, गडरलाइन, स्ट्रॉर्म ड्रेन लाइन, वीज, पाणीपुरवठा, बायोगॅससाठी वेगळी स्ट्रॉर्म ड्रेन, जनावरांसाठी शेड, तीन मैदान, दवाखाना, कृत्रिम रेतन केंद्र, दुधासाठी शीतगृह आदी बनविण्यात येणार होते. वाठोडामध्ये महापालिकेच्या मालकीच्या सिवरेज फार्मसाठी आरक्षित असलेली ४४.०६ एकर जागा या प्रकल्पासाठी मागितली होती. या जमिनीच्या युजर चेंजसाठी आवश्यक पाऊल उचलण्यात आले होते. परंतु, आतापर्यंत प्रकल्प फाइलच्या बाहेर पडला नाही. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या प्रस्तावाची फाइल शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली आहे. नगरविकास विभागाला त्यावर निर्णय घ्यायचा आहे. पशुसंवर्धन विभागाकडून त्यासाठी निधी उपलब्ध होऊ शकतो. या प्रकल्पामुळे शहरात बेवारस फिरणाऱ्या जनावरांपासून सुटकारा मिळणार आहे.

- ३४६० जनावरांची व्यवस्था

४४.६ एकर जमिनीवर ३४६० जनावरांची व्यवस्था होणार होती. त्यासाठी ३४६ शेड बनविण्यात येणार होते. प्रत्येक शेडमध्ये १० जनावरे बांधण्याची व्यवस्था होती. जनावरांना फिरण्यासाठी ३ मैदानांची व्यवस्था होती. पिण्याचे पाणी, रुग्णालय आदींचा समावेश प्रकल्पात होता. सहा वर्षांत राज्यात वारंवार सत्तापरिवर्तन झाले. मात्र, फाइलला हिरवी झेंडी मिळू शकली नाही.

- शहरात १०४६ गोठे

शहरात गोठ्यांची संख्या १०४६ आहे. तर शहरातील रस्त्यांवर अनधिकृत जनावरे पाळणाऱ्यांची संख्या शेकडो आहे. शहराच्या आउटर भागात ही संख्या जास्त आहे. एनडीएस स्कॉडतर्फे अवैध पशुपालकांवर कारवाई सुरू केली आहे. तरीही पशुपालक तिथून हटत नाही. अनेक वस्त्यांमध्ये अवैध पशुपालन सुरू आहे.

Web Title: No decision on Nandagram project for six years; Nagpur Municipal Corporation is still waiting for funds of 104 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.