वादळी वारा नागपुरातील बत्ती गुल

By आनंद डेकाटे | Published: May 9, 2024 03:47 PM2024-05-09T15:47:20+5:302024-05-09T15:48:01+5:30

हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला : मुसळधार पावसाने झोडपले, आकाश काळवंडले

No Electricity in Nagpur due to stormy wind | वादळी वारा नागपुरातील बत्ती गुल

No Electricity in Nagpur due to stormy wind

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात गुरुवारी सकाळी ९ वाजतापासून पडणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्यात अनेक भागात वृक्ष व त्याच्या फांद्या वीज तारांवर पडल्या. त्यामुळे या भागासह तसेच काही तांत्रिक कारणाने नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील अनेक भागाचा वीज पुरवठा खंडित झाला. वीज कर्मचाऱ्यांनी तक्रार मिळताच घटनास्थळ गाठले. परंतु पावसाचा जोर जास्त असल्याने बऱ्याच ठिकाणी वीज यंत्रणेच्या दुरुस्तीला अडचण येत होती.

हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरला. सकाळीच वादळी वाऱ्यासह पाऊस जोरदार बरसला. हवामान विभागाने ९ मे रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवित ऑरेंज अलर्ट जारी केला होता. तसेच १० ते १२ मे दरम्यान यलो अलर्ट सुद्धा जारी केलेला आहे.

गुरूवारी वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील झाडांच्या फांद्या तुटून वीज तारांवर, फिडरवर पडल्याने अनेक भागातील बत्ती सकाळीच गुल झाली. वीज पुरवठा खंडित झालेल्या भागात गोरेवाडा, बोरगाव, काटाेल रोड, अनंतनगर, जाफरनगरसह वंजारी नगर, प्रतापनगर, जानकीनगर, भोले बाबा नगर, विठ्ठल नगर, सरस्वती नगर, धरमपेठचा काही भाग, गायत्री नगर, दक्षिण नागपूरचा काही भाग, मध्य नागपुरच कही भागसह शहरातील अनेक भागांचा समावेश होता. खंडित झाल्याची माहिती कळताच महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वीज यंत्रणेतील दोष शोधण्याचे काम हाती घेत दुरुस्ती सुरू केली. काही भागात पावसाचा जोर जास्त असल्याने वीज कर्मचाऱ्यांना दुरुस्ती करता येत नव्हती. त्यामुळे ते पाऊस कमी होण्याची वाट बघत होते. दरम्यान काम शक्य असलेल्या परिसरात मात्र काही मिनीटात वीज पुरवठा सुरळीत केल्याचा महावितरणचे दावा आहे. दरम्यान वृक्ष वीज यंत्रणेवर पडलेल्या भगत अग्निशमन दलाची मदत घेतली जाणार आहे. वृक्ष बाजूला सारल्यावर वीज तार जोडण्यासह इतर कामे केली जाईल. त्यापूर्वी वीज पुरवठा इतर भागातून वाळवून वीज सुरळीत करण्याचे महावितरणकडून प्रयत्न होणार आहे.

 

Web Title: No Electricity in Nagpur due to stormy wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.