सदर रोडवर बसेसला ‘नो एन्ट्री’

By admin | Published: May 21, 2016 02:58 AM2016-05-21T02:58:32+5:302016-05-21T02:58:32+5:30

वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी प्रचंड वर्दळीचा रस्ता असलेल्या सदर रेसिडेन्सी रोडवरून २५ मे पासून दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत स्टार बस, एसटी आणि ट्रॅव्हल्सला बंदी घालण्यात आली आहे.

'No Entry' to Buses on Sadar Road | सदर रोडवर बसेसला ‘नो एन्ट्री’

सदर रोडवर बसेसला ‘नो एन्ट्री’

Next

सहपोलीस आयुक्तांचा अध्यादेश : २५ मे पासून दुपारी ४ ते रात्री १० पर्यंत वाहतुकीस बंदी
नागपूर : वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी प्रचंड वर्दळीचा रस्ता असलेल्या सदर रेसिडेन्सी रोडवरून २५ मे पासून दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत स्टार बस, एसटी आणि ट्रॅव्हल्सला बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात सहपोलीस आयुक्त राजवर्धन यांनी शुक्रवारी अध्यादेश जारी केले आहेत. २४ जूनपर्यंत ही बंदी राहील.

सदर रेसिडेन्सी रोड भागात शहरातील मुख्य बाजारपेठ असून या रोडवर ये-जा करणाऱ्या वाहनांची नेहमीच वर्दळ असते. रेसिडेन्सी रोड परिसर शहरातील जुना भाग असून या भागातील मार्ग रुंदीने लहान आहेत. त्यामुळे या परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. दिवसेंदिवस पार्किंग समस्येत वाढ होत आहे. शहरातील मध्यभागातून स्टार बसेस, एस.टी. बसेस, मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बसेस रेसिडेन्सी रोडकडून काटोल रोड व कोराडी रोड मार्गे पुढे जातात.
रेसिडेन्स रोड परिसरात महत्त्वाची बाजारपेठ असल्याने व शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असल्याने या भागात नेहमीच वाहनांची गर्दी राहते.
यातच रस्ता अतिशय छोटा आहे. अशावेळी तेथून स्टार बसेस, एस.टी. बसेस व ट्रॅव्हल्स जात असल्यास मार्ग आणखी लहान होतो. त्यामुळे इतर वाहन चालकांना त्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. किरकोळ अपघात तर नेहमीच होतात. त्यातून परिसरातील नागरिक व दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागतो यासाठी येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी व वाहन चालकांना त्रास होऊ नये म्हणून या रस्त्याने ये-जा करणाऱ्या स्टार बस, एस.टी. बसेस व ट्रॅव्हल्स बसेसना दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत प्रवेश बंद राहील.

असा राहणार पर्यायी मार्ग
रेसिडेन्सी रोडवर बंदी घालण्यात आली असल्याने पर्यायी मार्गसुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत एलआयसीकडून काटोल रोड किंवा कोराडी रोडकडे जाणाऱ्या स्टार बस, एसटी बस व ट्रॅव्हल्स या एलआयसी चौक मार्गे लिबर्टी टी पॉर्इंटकडून डावे वळण घेऊन सरळ राजभवन गेट, जुना काटोल नाका, पोलीस तलाव टी पॉर्इंटकडून उजवे वळण घेऊन सरळ पागलखाना चौकामार्गे पुढे जातील. पागलखना चौक जुना काटोल नाकाकडून एलआयसीकडे जाणारे जड वाहन जुना काटोल नाका, राजभवन, जपानी गार्डन चौकाकडून वळण घेऊन सदर पोलीस स्टेशन, मेट्रो कार्यालय, व्हीसीए चौक, लिबर्टी टी पॉर्इंट, एलआयसी चौकामार्गे पुढे जातील.

उड्डाणपूल कधी होणार
सदरवरील वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी स्टार बस, एसटी व ट्रॅव्हल्सला बंदी घालण्याचा निर्णय चांगला असला तरी तो यावर कायमस्वरूपी तोडगा होऊ शकत नाही. येथील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल होणार होता. तो कधी होणार असा प्रश्न या परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: 'No Entry' to Buses on Sadar Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.