आजार असोत बहु, जगण्याची इच्छाशक्ती सर्वांवर भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:08 AM2021-05-10T04:08:34+5:302021-05-10T04:08:34+5:30

- दत्तात्रयनगरातील भिलकर आजोबा : शुगर, थायरॉइड, ब्लॉकेजेस, पार्किन्सन असतानाही कोरोनाला दिली मात - पॉझिटिव्ह स्टोरी लोकमत न्यूज नेटवर्क ...

No matter the illness, the will to live is overwhelming | आजार असोत बहु, जगण्याची इच्छाशक्ती सर्वांवर भारी

आजार असोत बहु, जगण्याची इच्छाशक्ती सर्वांवर भारी

Next

- दत्तात्रयनगरातील भिलकर आजोबा : शुगर, थायरॉइड, ब्लॉकेजेस, पार्किन्सन असतानाही कोरोनाला दिली मात

- पॉझिटिव्ह स्टोरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दत्तात्रयनगर येथे राहणारे पंढरीनाथ भिलकर हे ७८ वर्षांचे आहेत. सर्वसाधारणत: हे वय आजोबा अशी हाक मारण्याचे आणि स्वरा, आरव व स्वयंम ही तिन्ही नातवंडे हा दंडोक इमाने इतबारे पार पाडतात. मात्र, काही दिवसांपूर्वी भिलकर कुटुंबात प्रचंड तणावाचे वातावरण पसरले होते. या काळात कोरोना संक्रमणाशिवाय तणावाचे दुसरे कोणते कारण असणार? पंढरीनाथ आजोबा व त्यांची पत्नी रुक्मिणी (६६) आजी दोघेही संक्रमणाने ग्रासले. विशेष म्हणजे, आजोबा अन्य गंभीर आजारांपासून आधिच पीडित. मात्र, जगण्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर घरूनच त्यांनी कोरोनावर मात केली. महिनाभरानंतर दोघेही कोरोनामुक्तीचा आनंद घेत आहेत.

पंढरीनाथ भिलकर हे गेल्या २५ वर्षांपासून मधुमेह, थायरॉइड, ब्लॉकेजेसच्या समस्यांनी ग्रस्त आहेत. वाढत्या वयासोबत या आजारांचा स्तरही गंभीर होत आहे. यासोबतच काही वर्षांपासून त्यांना पार्किन्सनने ग्रासले आहे. अशा स्थितीत गेल्या दहा वर्षांत त्यांच्यावर दोन-तीन सर्जरीही झाल्या आहेत. कोरोना संक्रमण काळात ते आणि त्यांचे कुटुंबीय अपेक्षेपेक्षा जास्त काळजी घेत असले तरी पंढरीनाथ व रुक्मिणी यांना कोरोनाचा संसर्ग जडला. पंढरीनाथ तर अंथरुणाला खिळले आणि जेवणे, चालणे थांबले होते. अशात १० एप्रिल रोजी दोघांचीही आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. चाचणीत पंढरीनाथ निगेटिव्ह तर रुक्मिणी पॉझिटिव्ह आल्या. मात्र, लक्षणे गंभीर दिसू लागल्याने लहान मुलगा प्रदीप भिलकर यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिटीस्कॅन काढला. या रिपोर्टमध्ये लंग्ज गरजेपेक्षा जास्त संक्रमित झाल्याचे स्पष्ट झाले आणि ऑक्सिजन लेव्हल ८४च्या खाली उतरली होती. अशा स्थितीत हॉस्पिटल, बेड्ससाठी प्रयत्न केले. मात्र, ते उपलब्ध झाले नाही. अखेर त्यांचे कौटुंबिक चिकित्सकांच्या मार्गदर्शनात घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. महिनाभराच्या योग्य त्या औषधी व मानसिक उपचारानंतर दोघेही कोरोनामुक्त झाले. विशेष म्हणजे, आधीच इतर आजारांचा शिरकाव शरीरात असताना आणि वर्तमानात कोरोना नावानेच खच्चीकरण झालेले असताना पंढरीनाथ आजोबा व रुक्मिणी आजीने जी इच्छाशक्ती दाखवली ती इतरांसाठी प्रेरणास्त्रोत नक्कीच ठरणार आहे.

---------------

संक्रमण दोघांना होते, मात्र काळजी आम्हाला घ्यायची होती

दोघांचेही वय बघता आणि विशेषत: वडिलांची स्थिती बघता वर्तमान परिस्थितीत हॉस्पिटल किंवा बेड उपलब्ध जरी झाला असता तरी डॉक्टरांनी ही केस स्वीकारली असती असे नक्कीच वाटत नाही. अनेक उदाहरणांवरून मी हे सांगू शकतो. अखेर आमच्या कौटुंबिक चिकित्सक डॉ. ममता बिजवे यांच्या मार्गदर्शनात घरीच उपचार करण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या मेडिकल हिस्ट्रीचा विचार करता त्यांना ॲलोपॅथी औषधी घातक ठरणार होती. अशा स्थितीत दोघांनाही संक्रमण झालेच नाही, असे भासवणे गरजेचे होते. हा मानसिक सशक्तीकरणाचा भाग होता व सोबत हाेमिओपॅथी औषधी देत होतो. आई-बाबा वगळता कोणीच संक्रमित नव्हतो, तरी देखील आमच्याशिवाय त्यांना बघणार कोण, हा प्रश्न होता. मी आणि माझी पत्नी अल्का आळीपाळीने जागत होतो. मोठा भाऊ मिलिंद व वहिनी भारती सातत्याने विचारपूस करत होते. मुलेही जराशी समजूत काढल्यावर संयमाने वागत होते आणि अखेर दोघांनीही कोरोनावर मात केली, हे महत्त्वाचे.

- प्रदीप भिलकर

......................

Web Title: No matter the illness, the will to live is overwhelming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.