मोबाइलचे नेटवर्क मिळेना, कॉलड्राॅपचाही वैताग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:11 AM2021-08-19T04:11:08+5:302021-08-19T04:11:08+5:30

कळमेश्वर : मागील काही महिन्यांपासून कळमेश्वर शहरासह तालुक्यात विविध कंपन्यांचे मोबाइल नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. फोनवर ...

No mobile network, call drop is also a nuisance | मोबाइलचे नेटवर्क मिळेना, कॉलड्राॅपचाही वैताग

मोबाइलचे नेटवर्क मिळेना, कॉलड्राॅपचाही वैताग

Next

कळमेश्वर : मागील काही महिन्यांपासून कळमेश्वर शहरासह तालुक्यात विविध कंपन्यांचे मोबाइल नेटवर्क मिळत नसल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. फोनवर बोलताना अचानक संभाषण तुटणे (काॅल ड्राॅप), नेटवर्क नसणे, वारंवार फोन लावूनही फोन न लागताच पैसे कट होणे, असे प्रकार वाढतच आहे. मोबाइलचे नेटवर्क व इंटरनेट कनेक्शन खंडित होत असल्याने ऑनलाइन शिक्षण घेणारे विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. यासोबतच वर्क फ्राॅम होम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना याचा सातत्याने फटका बसतो आहे.

यापूर्वी बीएसएनएलपुरती मर्यादित असलेला कॉल ड्रॉप व इंटरनेट कनेक्शन खंडित होण्याची पद्धत आता इतर मोबाइल कंपन्यांच्या बाबतीत होताना दिसत आहे. विविध कंपन्यांच्या इनकमिंग, आऊटगोइंग, लोकल, एसटीडी या सर्वच सेवांवर ग्राहकांनी काॅल ड्राॅपचा अनुभव घेतला आहे. फोनवरचा आवाज व्यवस्थित नसणे. मोबाइलमध्ये नेटवर्क असते. मात्र, तरीही फोन मध्येच कट होतो. अनेकांना एखाद्याला जर फोन लावायचा झाल्यास फोन लागत नाही. लागला तर त्यांचा आवाज संबंधिताला ऐकू न जाणे या प्रकारातही वाढ झालेली आहे. या सर्व गोंधळात मोबाइल कंपन्या ग्राहकांचे बॅलन्स पैसे मात्र कापून घेतात.

---

यंदाचे शैक्षणिक सत्र ऑनलाइन सुरू आहे. सध्यातरी दोन ते तीन तास शाळांचे वर्ग होत आहेत. ऑनलाइन वर्गात पूर्वीच विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी आहे. त्यात वारंवार गायब होणारे मोबाइलचे नेटवर्क प्रमुख अडचण ठरत आहे. ऑनलाइन क्लास सुरू असताना अचानक नेटवर्क जाते. त्यामुळे शिक्षकांची शिकवण्याची लिंक तुटते, तर मुलांचे लक्ष विचलित होते. अनेकदा शिक्षकांना वारंवार एकच गोष्ट सांगावी लागते. ऑनलाइन क्लासेसमध्ये जवळपास ७० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असते. या क्लासेसचा फायदा होतो आहे. मात्र, इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असल्याने अडचणी येतात.

-डॉ. मनीष निंबाळकर, शिक्षक, कळमेश्वर

---

महाविद्यालयाचे ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. मात्र, मोबाइलचे नेटवर्क मिळत नसल्याने आणि वारंवार नेट बंद पडत असल्याने अडचणी वाढल्या आहेत.

प्रीतम मंडलिक, विद्यार्थी

---

माझ्या मुलीचे ऑनलाइन क्लासेस सुरू आहेत. मात्र, अनेकदा इंटरनेट सेवा खंडित होत असल्याने याचा फटका बसतो.

-नीलेश अढाऊ, पालक

Web Title: No mobile network, call drop is also a nuisance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.