लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी नको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:10 AM2021-04-09T04:10:04+5:302021-04-09T04:10:04+5:30
कामठी : कामठी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. अशावेळी लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी (नागरिक) सहभागी झाल्यास संबंधितावर ...
कामठी : कामठी तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे. अशावेळी लग्न सोहळ्यात ५० पेक्षा जास्त वऱ्हाडी (नागरिक) सहभागी झाल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दिले आहेत. यासंदर्भात हिंगणे यांनी कामठी नगर परिषद, महादुला नगर पंचायत, नवीन कामठी पोलीस स्टेशन, जुनी कामठी पोलीस स्टेशन, संबंधित मंडळ अधिकाऱ्यांना उचित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.
तालुक्यात कोरोनाचा बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. नागरिक अद्यापही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करीत नाही. अशावेळी ग्रामीण भागात होणाऱ्या लग्न समारंभात आजही मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे यापुढे ५० पेक्षा जास्त उपस्थित नागरिक राहिल्यास वर व वधू पालकांविरोधात आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व भादंवि कलम १८८, २६९, २५७ अन्वये गुन्हे दाखल केले जाणार आहेत.