अंत्यविधीला जागा मिळेना अन् जयताळा घाटाकडे कुणी फिरकेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:06 AM2021-04-26T04:06:58+5:302021-04-26T04:06:58+5:30
- जयताळा घाट कार्यान्वित करण्याची ‘दीपस्तंभ’ची मागणी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण काळात दहन घाटांवर मृतदेहांना जागा ...
- जयताळा घाट कार्यान्वित करण्याची ‘दीपस्तंभ’ची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण काळात दहन घाटांवर मृतदेहांना जागा मिळत नाही किंवा वेटिंग लिस्ट लागली आहे. सर्वच घाटांवर मिळेत त्या जागेवर अंत्यविधी केले जात आहे. शहरातील घाटांची ही स्थिती असताना शहरातच असणाऱ्या जयताळा घाटावर मात्र कुणीच फिरकत नाही. अर्थात या घाटावर अंत्यविधी केले जात नसल्याचे दिसून येते. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हा घाट ओस पडला असून, दीपस्तंभ संस्थेने विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्यांची भेट घेत हा घाट कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे.
दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघात येणारा जयताळा दहनघाट लाकडाअभावी ओस पडला आहे. दीपस्तंभ संस्थेच्या वतीने नंदू मानकर यांनी यावेळी विरोधी पक्षनेत्यांना निवेदन दिले. सोबतच लक्ष्मीनगर झोन सभापती यांनाही निवेदन देण्यात आले. याप्रसंगी राजेंद्र चौरागडे, विनोदकुमार भेले, नितीन ढंगारे, मंगेश ईरपाची, राजेंद्र केवटे, प्रशांत कळसे, तरुण धारवैया, वागेश वर्मा, रिखिराम विजयवार, वर्षा मानकर, अमोल तेलपांडे, धर्मेंद्र नारनवरे, गजानन मुंजे, धम्मदीप नगराळे, विनोद महाजन, रोशन शर्मा, सूरज मिश्रा, ज्योती नाकतोडे, संगीता पानसे, रंजना खाडे उपस्थित होते़.
............