आता कुणीही घृणित कृत्य करण्याचे धाडस करणार नाही - डागा

By admin | Published: February 5, 2016 02:35 AM2016-02-05T02:35:32+5:302016-02-05T02:35:32+5:30

अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी या खटल्यात फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांचे वकील म्हणून काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षाला मोठी मदत केली.

No one will dare to do any abusive act - Daga | आता कुणीही घृणित कृत्य करण्याचे धाडस करणार नाही - डागा

आता कुणीही घृणित कृत्य करण्याचे धाडस करणार नाही - डागा

Next

अ‍ॅड. राजेंद्र डागा यांनी या खटल्यात फिर्यादी डॉ. मुकेश चांडक यांचे वकील म्हणून काम पाहिले. त्यांनी सरकार पक्षाला मोठी मदत केली.
ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, दुहेरी फाशीच्या शिक्षेचा नागपुरातील हा पहिलाच निर्णय आहे. या निर्णयानंतर कोणीही घृणित कृत्य करण्याचे धाडस करणार नाही. २०११ मध्ये भारतीय दंड विधानात सुधारणा झाली. वारंवार खंडणीसाठी अपहरणाच्या विशेषत: निष्पाप बालकांच्या अपहरणाच्या घटना घडत असल्याने ३६४-अ हे सुधारित कलम आले. यात फाशी आणि जन्मठेप, अशा दोन्ही शिक्षेचे प्रावधान आहे. कुश अपहरण-खुनाच्या प्रकरणात हे कलम सत्र न्यायालयात सिद्ध झाले नाही. मात्र उच्च न्यायालयात सिद्ध झाले. युग प्रकरणात योग्य न्याय मिळाला, ५० साक्षीदारांपैकी एकही होस्टाईल झाला नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: No one will dare to do any abusive act - Daga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.