पाऱ्याला नाही पारावार!
By admin | Published: March 29, 2017 02:48 AM2017-03-29T02:48:02+5:302017-03-29T02:48:02+5:30
यासोबतच विदर्भात सर्वांधिक तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरातील पारा हा ४३.२ अंशावर पोहोचला आहे.
मार्च एन्डिंगलाच ४२.६ वर : यावर्षीचे सर्वाधिक तापमान
यासोबतच विदर्भात सर्वांधिक तापमानासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपुरातील पारा हा ४३.२ अंशावर पोहोचला आहे. मागील गेल्या काही दिवसांपासून उपराजधानीत पारा सतत वर चढत आहे. त्याचवेळी उष्णतेची ही लाट पुढील काही दिवस अशीच कायम राहील असा अंदाज आहे. गेल्या तीन दिवसांत उपराजधानीतील पारा हा ४२ अंशाभोवती फिरतो आहे. मात्र मागील २४ तासात नागपुरातील तापमानात अचानक २.२ अंशाने वाढ झाली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक तापमान नोंदले जाण्याची शक्यता आहे. या वाढत्या तापमानाने जनजीवन प्रभावित झाले आहे. दुपारी अक्षरश: उन्हाचे चटके बसू लागले आहेत. यामुळे रस्ते ओस पडल्याचे चित्र दिसून येते. सायंकाळी उशिरापर्यंत उन्हाच्या झळा जाणवतात. उन्हापासून बचाव करण्यासाठी दुपट्टे, टोप्या तसेच गॉगल्सची मागणी वाढली असून, घराघरात एसी आणि कूलरचा आधार घेतला जात आहे. शीतपेयांच्या दुकानातही मोठी गर्दी वाढली आहे. त्याचवेळी या उष्णतेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असून, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सिमेंट रस्त्यांवर असह्य चटके
हवामान तज्ज्ञांच्या मते, उपराजधानीत दरवर्षी मार्च महिन्यातील तापमान ३८ ते ४० अंशा दरम्यान असते. मात्र यंदा मार्च महिन्यातील तापमानाने ४२.९ चा टप्पा गाठला असून, हा आतापर्यंतच्या तापमानाचा सर्वोच्च उच्चांक आहे. शिवाय यापुढे तापमानात पुन्हा सतत वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षभरात शहरात सिमेंट रस्त्यांची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. त्याचाही तापमानावर परिणाम होत असून, दुपारी या रस्त्यावर उन्हाची अधिकच तीव्रता जाणवते. उन्हामुळे तापलेल्या या सिमेंट रस्त्यावरून चालताना शरीराला अक्षरश: असह्य चटके बसतात.