-तर वेतनवाढही मिळणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:24 AM2017-09-09T01:24:59+5:302017-09-09T01:25:13+5:30
शासन निर्णयानुसार महापालिकेने वेळोवेळी परिपत्रक काढून कर्मचारी व अधिकाºयांना एमएससीआयटी करण्याचे आवाहन केले होते. परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने परिपत्रक काढून वेतनवाढ रोखण्याचा इशारा दिला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासन निर्णयानुसार महापालिकेने वेळोवेळी परिपत्रक काढून कर्मचारी व अधिकाºयांना एमएससीआयटी करण्याचे आवाहन केले होते. परंतु अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने महापालिकेने परिपत्रक काढून वेतनवाढ रोखण्याचा इशारा दिला होता. यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष पसरल्याने एमएससीआयटी हा संगणक अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आता येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़ त्यानंतर जे अधिकारी, कर्मचारी हा अभ्यासक्रम पूर्ण करणार नाही, त्यांची वेतनवाढ थांबविली जाईल़ शिवाय यापूर्वी ज्यांना वेतनवाढ मिळाली आहे, त्यांच्याकडून वाढीव रक्कम परत घेतली जाणार आहे़ याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी १५ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे.
संगणक साक्षरता ही आता अनिवार्य बाब झाली आहे़ नागपूर महापालिकेने वर्ष २००७ मध्ये यासंदर्भातील एक परिपत्रक काढले होते. त्यानुसार महापालिकेच्या अधिकाºयांना व कर्मचाºयांना संगणक प्रशिक्षण घेणे बंधनकारक होते. परंतु, अधिकारी, कर्मचाºयांनी या आदेशाकडे पाठ फिरविली. आता तब्बल १० वर्षांनंतर महापालिकेला या निर्णयाची आठवण झाली. प्रशासनाने गत ३० मार्च रोजी १०४ कर्मचारी, अधिकाºयांना पदोन्नती दिली होती़ त्यावेळी हा मुद्दा ऐरणीवर आला़, नंतर प्रशासनाने एमएससीआयटी अनिवार्य असल्याचे परिपत्रक काढले़ यातून ५० वर्षांवरील कर्मचारी व अधिकाºयांना सूट देण्यात आली़ जे कर्मचारी एमएससीआयटी प्रशिक्षित नाही, परंतु वय ५० वर्षे पूर्ण झाले असेल अशांना पदोन्नतीने वेतनवाढीचा दिलासा मिळाला होता़ मात्र, यातील ज्या कर्मचाºयांना वेतनवाढ वयाच्या चाळीसाव्या वर्षी मिळाली असेल तर त्यांना १० वर्षांत मिळालेली वेतनवाढ परत करावी लागणार होती़ यामुळे अधिकारी, कर्मचाºयांमध्ये असंतोष पसरला होता़ त्यामुळे आता एमएससीआयटी संगणक प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़
या कालावधीत जे अधिकारी, कर्मचारी अभ्यासक्रम पूर्ण करणार नाही, त्यांची वेतनवाढ थांबविली जाईल़ तर ज्यांना आधीच वेतनवाढ मिळाली आहे, त्यांची वेतनवाढ परत घेतली जाणार आहे़ सामान्य प्रशासन विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे़ १५ सप्टेंबर रोजी होणाºया महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे़