ना शाळा, ना परीक्षा; ८ लाख ७२ हजार विद्यार्थी पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:07 AM2021-06-22T04:07:13+5:302021-06-22T04:07:13+5:30

नागपूर : कोरोनाचा सर्वात मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोनाने शिक्षण क्षेत्राची पुरती दुरावस्था ...

No school, no exams; 8 lakh 72 thousand students pass! | ना शाळा, ना परीक्षा; ८ लाख ७२ हजार विद्यार्थी पास!

ना शाळा, ना परीक्षा; ८ लाख ७२ हजार विद्यार्थी पास!

Next

नागपूर : कोरोनाचा सर्वात मोठा फटका शिक्षण क्षेत्राला बसला आहे. मार्च २०२० मध्ये आलेल्या कोरोनाने शिक्षण क्षेत्राची पुरती दुरावस्था केली आहे. वर्षभरात शाळा सुरू झाल्या नाही, वर्ग सुरू होऊ शकले नाहीत, सरकारला परीक्षाही रद्द कराव्या लागल्या. काही शाळांमध्ये ऑनलाईन शिकविले गेले. पण परीक्षाच झाली नसल्याने त्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन होऊ शकले नाही. जिल्ह्यात पहिली ते दहावीचे जवळपास ८ लाख ७२ हजार ६३२ विद्यार्थी आहेत जे परीक्षेविना पास झाले आहेत.

डिसेंबर २०२० मध्ये शासनाने नववी-दहावीच्या शाळा सुरू केल्या. त्यानंतर पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा सुद्धा प्रयत्न होता. परंतु कोरोनामुळे तो फसला. मार्चनंतर जिल्ह्यात कोरोनाची लाट इतकी उसळली की, हजारो लोकांचे जीव गेले. विदर्भातील शाळा यंदा २८ जून रोजी उघडणार आहेत. पण शासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची रिस्क घेतली नाही. २८ जूनपासून शिक्षक मात्र उपस्थित राहणार आहेत. तिसऱ्या लाटेच्या भीतीने शाळा सुरू करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला नाही. पण शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शाळेने दिलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर आरटीईचा शेरा मारला आहे.

- जिल्ह्यातील शाळा

जिल्हा परिषद - १५३०

महानगरपालिका - १५६

नगरपालिका - ६८

खासगी अनुदानित शाळा - १२०२

विना अनुदानित शाळा - ११५५

एकुण विद्यार्थी - ८,७२,६३२

- ऑनलाईन शिक्षणाचे फायदे

कोरोनाच्या संसर्गात शिक्षण सुरू राहण्यासाठी ऑनलाईन शिक्षण हे एकमेव माध्यम ठरू शकले. यामुळे देशातील, जगातील शिक्षक विद्यार्थ्यांसोबत संपर्क साधू शकतात. लॉकडाऊनमुळे सर्व शिक्षण केंद्रे बंद होती. त्यामुळे मुलांना घरबसल्या शिकता आले. ऑनलाईन वर्गात शिक्षकांचा एखादा मुद्दा न समजल्यास, रेकॉर्ड केलेले लेक्चर विद्यार्थी पुन्हा पाहू शकतो. अभ्यासातील काही गोष्टी समजल्या नाही, तर गुगलवर सोप्या भाषेत शोधू शकतो.

- ऑनलाईन शिक्षणाचे तोटे

विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेतले नाही. ऑनलाईन क्लासमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती नगण्य असते. शिक्षक नेमके काय शिकवित आहे, अनेकदा विद्यार्थ्यांना कळत नाही. ऑनलाईन शिक्षण वन-वे कम्युनिकेशन असते. मुलांचे मन विचलित होऊ शकते, शिस्तीची कमतरता असते. मागास विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहिले आहे.

- ग्रामीणमध्ये ७० टक्के विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

ऑनलाईन शिक्षणात ग्रामीण भागात सर्वात मोठी अडचण संसाधनांची आहे. त्याचबरोबर नेटवर्क कनेक्टीव्हीटीचा सुद्धा मोठा त्रास आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शिक्षक असो की विद्यार्थी यांनी ऑनलाईन शिक्षणाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे ग्रामीणमध्ये ७० टक्के विद्यार्थी गेल्या सत्रात शिक्षणापासून वंचित होते. शहरामध्ये काही नामांकित शाळेत ऑनलाईन शिक्षण झाले. पण विद्यार्थ्यांनी त्यांना किती सकारात्मक प्रतिसाद दिला. याचे मूल्यांकन होऊ शकले नाही. परीक्षा झाली असती तर ऑनलाईन शिक्षणाची सकारात्मकता दिसून आली असती, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: No school, no exams; 8 lakh 72 thousand students pass!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.