फुटाळ्यावरील बांधकामाचे संरचनात्मक ऑडिटच केले नाही ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:07 AM2021-03-05T04:07:35+5:302021-03-05T04:07:35+5:30

श्रेयस हाेले नागपूर : ग्रेड-१ चा ऐतिहासिक वारसा असलेल्या फुटाळा तलावावर बांधकाम सुरू करताना मेट्राेद्वारे संरचनात्मक (स्ट्रक्चरल) ऑडिटच करण्यात ...

No structural audit of construction on Futala () | फुटाळ्यावरील बांधकामाचे संरचनात्मक ऑडिटच केले नाही ()

फुटाळ्यावरील बांधकामाचे संरचनात्मक ऑडिटच केले नाही ()

Next

श्रेयस हाेले

नागपूर : ग्रेड-१ चा ऐतिहासिक वारसा असलेल्या फुटाळा तलावावर बांधकाम सुरू करताना मेट्राेद्वारे संरचनात्मक (स्ट्रक्चरल) ऑडिटच करण्यात आले नसल्याचा आराेप पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे. एवढेच नाही तर पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाबाबत (ईआयए) परवानगी न घेता काम सुरू करण्यात आल्याचा आराेपही करण्यात आला आहे.

फुटाळा तलावातील पाण्याची पातळी सातत्याने घसरत असल्याची बाब समाेर आली आहे. तलावाखाली भूजल वाहिन्या खंडित झाल्याने पाण्याचे आतमध्येच लिकेज हाेत असल्याची शक्यता पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे. उल्लेखनीय म्हणजे सध्या तलावाशेजारी पर्यटकांसाठी गॅलरीचे तसेच मेट्राेच्या पार्किंग प्लाझाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामामुळेच काहीतरी बिघाड झाला असून, त्याचा विपरीत परिणाम तलावावर पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तलावाच्या संवर्धनाबाबत २००१ मध्ये जनहित याचिका दाखल करणारे पर्यावरण तज्ज्ञ श्रीकांत देशपांडे यांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले, फुटाळा तलाव १७९९ मध्ये भाेसले राजाने बनविला असून, ताे ग्रेड-१ वारसा स्थळामध्ये त्याचा समावेश हाेताे. त्या तलावाच्या परिसरात काेणतेही बांधकाम करण्यापूर्वी हेरिटेज कमिटीकडून परवानगी घेणे आवश्यक असते. कमिटीने बांधकामाची परवानगी दिली असेल तर ते आश्चर्यच म्हणायला हवे. तलावाच्या कॅचमेंट परिसरात हाेणाऱ्या अतिक्रमणामुळे तलाव ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही

सध्या तलावाच्या काठावरच म्युझिकल फाऊंटेन व लेझर शाेसाठी प्रेक्षक गॅलरी निर्मितीचे काम चालले आहे, शिवाय पार्किंग प्लाझाचेही काम सुरू आहे. हे काम मेट्राेद्वारे केले जात आहे. मात्र मेट्राेने बांधकाम सुरू करण्यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिटच केले नसल्याचा आराेप देशपांडे यांनी केला. शिवाय ईआयएबाबतची परवानगीही घेतली नाही. या बांधकामामुळे तलावातील भूजल जाळे विचलित झाले असून, त्यामुळे पाणी घटत चालल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. हे तलाव जलचर प्राण्यांचे अधिवास आहे. पण शहरातील जलस्तरही यावर अवलंबून आहे. तलावाचे पाणी आटले तर अनेक भागात जलस्तर कमी हाेण्याची भीती देशपांडे यांनी व्यक्त केली. ही बाब पर्यावरणाला माेठी हानी पाेहोचविणारी आहे. त्यामुळे या संपूर्ण कामाची चाैकशी हाेणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

केंद्रीय भूजल मंडळाने सर्वेक्षण करावे

- तलावाचे पाणी कमी हाेत आहे, याबाबतही केंद्रीय भूजल मंडळाच्या पथकाद्वारे सर्वेक्षण करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. तलाव संवर्धनासाठी वेळीच उपाययाेजना करण्याची गरज देशपांडे यांनी व्यक्त केली.

लिकेज भूजलस्तरावर परिणाम करणारे

- तलावातील पाण्याचे लिकेज भूजलस्तरावर परिणाम करणारे आहे. जलसाठे हे पावसाचे पाणी साठवून ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र हे जलसाठेच पाणी धरून ठेवू शकले नाही तर भूजलस्तरावर त्याचे गंभीर परिणाम हाेतील आणि शहरात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण हाेइल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

Web Title: No structural audit of construction on Futala ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.