नागपुरात नळाला नाही धार, नागरिक झाले बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 09:17 PM2021-01-11T21:17:50+5:302021-01-11T21:20:04+5:30

No water, nagpur news एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठाही कमी दाबाने होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे टिल्लू पंपाचा वापर वाढला आहे.

No water in Nagpur, citizens became in trouble | नागपुरात नळाला नाही धार, नागरिक झाले बेजार

नागपुरात नळाला नाही धार, नागरिक झाले बेजार

Next
ठळक मुद्देदिवसाआड पाणी, त्यातही दाब नाही : टिल्लू पंपाचाही वापर वाढला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : ६ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत गोरेवाडा स्थित (पेंच १, पेंच २, पेंच ३) आणि गोधनी (पेंच ४) जलशुद्धीकरण केंद्रावर आधारित असलेले लक्ष्मीनगर झोन, धरमपेठ, हनुमान नगर, धंतोली, मंगळवारी, आसीनगर तसेच सतरंजीपुरा झोन या भागात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. हा पाणीपुरवठाही कमी दाबाने होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे टिल्लू पंपाचा वापर वाढला आहे.

सक्करदारा परिसरातील नागरिकांनी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार केली आहे. अन्य काही भागातील नागरिकांच्याही टिल्लू पंपाचा वापर होत असल्याने नळाला पाणी येत नसल्याच्या तक्रारी आहेत. काही नागरिकांना पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत.

पंपाचा वापर होत असलेल्या वस्त्या

मनपा व ओसीडब्ल्यू यांनी पंपाचा सर्रास वापर होणाऱ्या भागाची माहिती घेतली आहे. यात धंतोली झोन अंतर्गत महाल, सावित्रीबाई फुले नगर, वकीलपेठ, सिरसपेठ, भालदारपुरा आणि बाजेरिया, बजरंग नगर, आंबेडकर मार्ग, आशी नगर झोनमध्ये दीक्षित नगर, यशोधरा नगर, धरमपेठ झोनमधील फुटाला वस्ती, संजय नगर वस्ती, हजारी पहाड, सुरेंद्रगढ, सतरंजी पुरा झोन भागातील मोमिनपुरा, मोहम्मद आली सराय, कुंभार पुरा, बरसे नगर, शोभा खेत, लष्कारीपुरा घासी पुरा, हनुमान नगर झोनमध्ये राहटे नगर टोळी, नेहरू नगरमधील ताजबाग, या भागात बेकायदेशीररीत्या टिल्लू पंप मोठ्या प्रमाणात वापरले जात आहेत.

कायदेशीर कारवाईचा इशारा

बेकायदेशीररीत्या बूस्टर टिल्लू पंप वापरून जास्तीचे पाणी घेणे हे केवळ बेकायदेशीरच आहे. मनपाच्या पाणी उपविधीनुसार दंडनीय अपराध आहे व असा वापर करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येऊ शकते. मनपा पाणीपट्टी दर उपविधीनुसार बूस्टर पंप अथवा तत्सम उपकरण वापरल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. यात पाणीपुरवठा खंडित करून पंप जप्त करण्याचा इशारा मनपाने दिला आहे. ओसीडब्ल्यू व मनपाने नागरिकांना टिल्लू पंप न वापरण्याचे आवाहन केले आहे. पंपाचा वापर होत असल्याने मनपा व ओसीडब्ल्यूला कळविण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: No water in Nagpur, citizens became in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.