नागपूरमधून नऊ तर रामटेकमधून दोघांनी भरले उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:41 PM2019-03-22T22:41:06+5:302019-03-22T22:45:56+5:30
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी नागपूर मतदार संघातून ९ उमेदवारांनी ११ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. रामटेक लोकसभा मतदार संघातून दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी नागपूर मतदार संघातून ९ उमेदवारांनी ११ नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. रामटेक लोकसभा मतदार संघातून दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.
नागपूर लोकसभा मतदार संघात शुक्रवारी दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये मनोज कोठूजी बावणे (अपक्ष), प्रभाकर कृष्णाजी सातपैसे (अपक्ष), अॅड. विजया दिलीप बागडे (आंबेडकर राईट्स पार्टी ऑफ इंडिया), रुबेन डॉमिनिक फ्रान्सिस (अपक्ष), कार्तिक गेंडालाल डोके (अपक्ष), अॅड. सुरेश तातोबा माने (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी), वनिता जितेंद्र राऊत (अखिल भारतीय मानवता पक्ष), खुशबू मुकेश बेलेकर (बळीराजा पार्टी), योगेश कृष्णराव आकरे-सीपीआय (एम) रेड स्टार या उमेदवारांनी आपली नामनिर्देशन पत्रे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांना सादर केली.
नागपूर लोकसभा मतदार संघातून यापूर्वी नामनिर्देशन पत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये अब्दुल करीम अब्दुल गफार पटेल (केआयआर) एआयएमआयएम, उल्हास शालिकराम दुपारे(अपक्ष) व दीपक लक्ष्मणराव मस्के (अपक्ष) या उमेदवारांचा समावेश आहे. नागपूर लोकसभा मतदार संघातून आतापर्यंत एकूण १२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
त्याचप्रकारे रामटेक लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी दोन उमेदवारांनी तीन नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. नाम निर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये चंद्रभान बळीराम रामटेके (राष्ट्रीय जन सुराज्य पक्ष), कॉम्रेड बंडू रामचंद्र मेश्राम (भाकपा(माले)रेड स्टार) यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज अपर जिल्हाधिकारी तथा रामटेक लोकसभा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांनी स्वीकारले.