बटेंगे तो कंटेंगे’ नाही, तर ‘जियो और जिने दो’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 05:08 PM2024-11-15T17:08:06+5:302024-11-15T17:12:07+5:30
Nagpur : मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितु पटवारी यांचे उत्तर
कमलेश वानखेडे, नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘बटेंगे तो कटेंगे’ चा नारा दिला. यावर मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितु पटवारी यांनी ‘जियो और जिने दो’ असे म्हणत उत्तर दिले. देशात दोन विचार सुरू आहेत. एकीकडे धोका, विश्वासघात आहे तर दुसरीकडे विश्वास आहे. या निवडणुकीत विश्वासघात हरेल आणि विस्वास जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नागपुरात शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना जितु पटवारी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लोकांमध्ये दरी वाढवली आहे. काही लोकांजवळ मोठ्या प्रमाणात पैसा आहे तर काही गरिबीमध्ये जगत आहेत. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पंतप्रधान मोदी हे नवा भारत म्हणतात, त्यात मोठ्या प्रमाणात आमदार खासदार यांची विक्री होते. रात्रीच्या अंधारात हे काम करतात. राज्यपाल सुद्धा कधी सरळ न बोलणारे शपथ विधी साठी रात्रभर जगतात. महाराष्ट्रातील सरकार हे धोकाधडी सरकार आहे. यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी केली. अजित पवार सारखे लोक आहे ज्यांनी आधी भाजप वर टीका केली शिव्या दिल्या ते आता त्यांच्या वॉशिंग मशीन मध्ये धुतले गेले आणि त्यांच्या सोबत जाऊन बसले, अशी टीका त्यांनी केली.
मध्यप्रदेशातील गॅरंटी खोट्या निघाल्या
मध्य प्रदेश सरकारने ज्या गॅरंटी दिल्या त्या सगळ्या खोट्या निघाल्या. मध्य प्रदेशात लाडकी बहीण ला पैसे दिले जात आहे ते योग्य प्रकारे भेटत नाही आता महाराष्ट्रात तेच सुरू केलं लोकांची दिशाभूल केली जात आहे. काँग्रेस सर्वसाधारण लोकांसाठी विचार करते. जातगणनेची मागणी आम्ही केली आहे. महाविकास आघाडीने ज्या घोषणा केल्या त्या आम्ही पूर्ण करू, असा जितु पटवारी यांनी व्यक्त केला.