फार्मासिस्ट नव्हे, ड्रेसरने तपासले रुग्ण : डिक दवाखान्यातील धक्कादायक प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:25 AM2019-07-14T00:25:46+5:302019-07-14T00:27:16+5:30

मनपाच्या डिक दवाखान्यातील डॉक्टर शुक्रवारी गैरहजर असल्याने त्यांच्या जागेवर स्वत:ला फार्मासिस्ट म्हणून घेणाऱ्या चक्क ‘ड्रेसर’ने रुग्ण तपासले. चतुर्थ कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची तपासणी होत असेल तर मनपाच्या दवाखान्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Not a pharmacist; Dreser checked patients: Shocking practice in Dick hospital | फार्मासिस्ट नव्हे, ड्रेसरने तपासले रुग्ण : डिक दवाखान्यातील धक्कादायक प्रकार

फार्मासिस्ट नव्हे, ड्रेसरने तपासले रुग्ण : डिक दवाखान्यातील धक्कादायक प्रकार

googlenewsNext
ठळक मुद्देरुग्णाच्या जीवाशी खेळ : प्रभारी आयुक्तांनी घेतली डॉक्टरांची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाच्या डिक दवाखान्यातील डॉक्टर शुक्रवारी गैरहजर असल्याने त्यांच्या जागेवर स्वत:ला फार्मासिस्ट म्हणून घेणाऱ्या चक्क ‘ड्रेसर’ने रुग्ण तपासले. चतुर्थ कर्मचाऱ्यांकडून रुग्णांची तपासणी होत असेल तर मनपाच्या दवाखान्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्याचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


‘लोकमत’ने १३ जुलैच्या अंकात ‘डॉक्टर सुटीवर, फार्मासिस्ट तपासतो रुग्ण’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच खळबळ उडाली. मनपाचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी डॉक्टरांची बैठक घेऊन या प्रकरणाचा आढावा घेतला. यामुळे दोषींवर मनपा प्रशासन काय कारवाई करते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनपा दवाखान्यातील आरोग्य सेवांची भीषण दुरवस्था व विषमतेला घेऊन शुक्रवारी ‘लोकमत’ चमूने व्हीआयपी रोड धरमपेठ येथील मनपाच्या डिक दवाखान्याला भेट दिली. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची लांब रांग लागली होती. दवाखान्याच्या प्रमुख डॉ. भावना सोनकुसळे या गैरहजर होत्या. यामुळे स्वत:ला फार्मासिस्ट म्हणणाºया इसमाने रुग्णाला तपासण्याची जबाबदारी घेतली. येथील परिचारिका दीपाली गणोरकर रुग्णांकडून ‘ओपीडी रजिस्ट्रेशन’ फी घेत होत्या तर त्यांच्याच बाजूला बसलेला फार्मासिस्ट रुग्णाची तपासणी करून स्वत:च औषधाचे वाटप करीत होता. लोकमत प्रतिनिधीलाही त्यानेच तपासून औषधेही दिली. शनिवारी या प्रकरणाची आणखी माहिती घेतली असता तो फार्मासिस्ट नव्हे तर रुग्णांच्या जखमेवर मलमपट्टीचे काम करणारा ‘ड्रेसर’ असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, दवाखान्याच्या प्रमुख डॉ. सोनकुसळे यांनी शुक्रवारी रीतसर सुटी घेतली नव्हती, यामुळे मनपा प्रशासनाला त्यांच्या जागी दुसºया डॉक्टरांची ड्युटी लावता आली नसल्याचेही पुढे आले आहे. शनिवारी मात्र त्यांनी रीतसर सुटी घेतल्याने मनपा प्रशासनाला त्यांच्या जागी वेळेवर दुसºया डॉक्टरांची ड्युटी लावावी लागली. सूत्रानूसार, या घटनेला घेऊन मनपाच्या आरोग्य विभागाच्या (एम) अधिकारी डॉ. सरिता कामदार यांनी डिक दवाखान्याला भेट देऊन माहिती घेतल्याचे समजते. मनपाचे प्रभारी आयुक्त ठाकरे यांनी कायमस्वरुपी असलेल्या डॉक्टरांची बैठक घेतली. भविष्यात अशी घटना घडू नये याबाबत चर्चाही केली.
नागपूरकरांनी व्यक्त केला संताप
या प्रकरणाबाबत मात्र नागपूरकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काहींनी ‘लोकमत’ला फोन करून हा प्रकार डिक दवाखान्यातच चालत नाही तर मनपाच्या इतरही दवाखान्यात चालत असल्याचे पुरावे देत सांगितले. लोकांच्याच पैशातून त्यांच्याच जीवाशी सुरू असलेला हा खेळ थांबविण्याची मागणीही अनेकांनी केली.
रुग्ण तपासणाऱ्याला नोटीस बजावणार
मनपाचे आरोग्य विभाग (एम) सुधारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ‘लोकमत’च्या माध्यमातून शनिवारी समोर आलेल्या घटनेचा आढावा घेण्यात आला. डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्ण तपासणाऱ्याला नोटीस बजावली जाईल.
रवींद्र ठाकरे
प्रभारी आयुक्त, मनपा

Web Title: Not a pharmacist; Dreser checked patients: Shocking practice in Dick hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.