राजकारण नव्हे विकासकारण करू! गडकरींचे भावनिक आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 08:39 PM2019-05-23T20:39:16+5:302019-05-23T20:42:13+5:30

कुठल्याही निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. परंतु निवडणूक संपली की हे सर्व राजकीय मतभेद आपण विसरणे गरजेचे असते. आता निवडणूक संपली आहे. तेव्हा केवळ भाजपच नव्हे तर विविध राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नागपूरच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. केवळ करायचे म्हणून राजकारण करण्यापेक्षा, जनतेच्या प्रगतीसाठी विकासकारण करू या, असे भावनिक आवाहन नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गडकरी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रात्री त्यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली.

Not Politics but development! Emotional appeal of Gadkari | राजकारण नव्हे विकासकारण करू! गडकरींचे भावनिक आवाहन

राजकारण नव्हे विकासकारण करू! गडकरींचे भावनिक आवाहन

Next
ठळक मुद्देनागपूरकरांचे मानले आभार

लोकमत न्यूज नेटवर्क  
नागपूर : कुठल्याही निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचारात सक्रिय होतात. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतात. परंतु निवडणूक संपली की हे सर्व राजकीय मतभेद आपण विसरणे गरजेचे असते. आता निवडणूक संपली आहे. तेव्हा केवळ भाजपच नव्हे तर विविध राजकीय पक्षांच्या नेते, कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नागपूरच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. केवळ करायचे म्हणून राजकारण करण्यापेक्षा, जनतेच्या प्रगतीसाठी विकासकारण करू या, असे भावनिक आवाहन नागपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. गडकरी यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रात्री त्यांनी ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली.
माझ्या प्रामाणिक भावनेचा जनतेने सन्मान केला
लोकांची कामे करताना मी कधीही पक्षअभिनिवेष ठेवला नाही. जातीधर्माचा विचार केला नाही. आपल्याकडे कामे घेऊन येणारी प्रत्येक व्यक्ती ही सर्वप्रथम या देशाची नागरिक आहे, नंतर ती कुठल्या तरी पक्षाचा कार्यकर्ता आहे, ही प्रामाणिक भावना ठेवून लोकांची मी कामे केली. त्याचेच फळ म्हणून नागपूरकरांनी माझ्या झोळीत मतांचे दान टाकले. पुढील काळात अधिक लोकाभिमुख वागण्याची जबाबदारी नागरिकांनी माझ्यावर टाकली आहे.
नागपूरचा नावलौकिक वाढविण्यास कटिबद्ध
मागील पाच वर्षांत नागपूरचा वेगाने विकास झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघांनीही नागपूर व विदर्भाच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. पुढील पाच वर्षात नागपूरचा जगात नावलौकिक कसा वाढेल या दृष्टीने आमचे सर्वांचेच प्रयत्न राहतील. भविष्यातील नागपूर हे एक जागतिक दर्जाचे शहर असेल आणि देशात विकासाचा एक आदर्श राज्याची उपराजधानी प्रस्थापित करेल. जनतेने मला साथ दिली व त्यामुळेच विकास करण्याची संधी मला प्राप्त झाली.
रोजगार निर्मितीवर राहणार भर
नागपुरात जास्तीत जास्त प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यावर भर राहणार आहे. नागपूर ‘मेट्रो’ला सुरुवात झाल्याने शहराचा दर्जा वाढला आहे. शहरात दर्जेदार राष्ट्रीय शैक्षणिक संस्था आल्या आहेत. ‘इन्फोसिस’, ‘टीसीएस’, ‘एचसीएल’ यांच्यासह विविध ‘आयटी’ कंपन्यांचे ‘मिहान’मध्ये काम सुरू झाले आहे. उद्योगधंद्यांना आवश्यक असे पोषक वातावरण येथे तयार झाले आहे. जागतिक पातळीवरील अनेक मोठ्या कंपन्यांची नागपूरकडे नजर आहे व भविष्यात नागपुरातील गुंतवणूक नक्कीच वाढेल.

Web Title: Not Politics but development! Emotional appeal of Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.