चुकीच्या समजामुळे योग्यवेळी उपचार न घेणे हा मनाच्या ‘हॅकिंग’चा प्रकार -डॉ. चंद्रशेखर मेश्राम
By सुमेध वाघमार | Published: March 10, 2024 11:10 PM2024-03-10T23:10:24+5:302024-03-10T23:10:35+5:30
‘सायकॅट्रीक सोसायटी’चा अध्यक्षपदी डॉ. मनीष ठाकरे.
नागपूर : समाजात असणाºया चुकीच्या समजामुळे योग्य वेळी उपचार न घेणे हा मनाच्या ‘हॅकिंग’चाच एक प्रकार आहे, मेंदूचे आरोग्य जपण्यासाठी चांगले मन असणे गरजेचे आहे, त्याचा वापरही चांगला व्हायला हवा, असे मत प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी येथे व्यक्त केले.
‘सायकॅट्रीक सोसायटी’ नागपूर शोखचे पदग्रहण सोहळा रविवारी एका खासगी हॉटेलमध्ये पार पडला. या सोहळ्यात डॉ. मेश्राम यांचा पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, प्रसिद्ध मानसिकरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर भावे यांच्यासह सोसायटीचे नवनियुक्त अध्यक्ष डॉ. मनीष ठाकरे, सचिव डॉ. सुधीर महाजन, माजी अध्यक्ष डॉ. निखिल पांडे व माजी सचिव डॉ.अभिषेक मामर्डे उपस्थित होते.
-मानसिक उपचारांची वाढती गरज
डॉ. गजभिये म्हणाले, समाजात वाढत असलेले व्यसन, सामाजिक बदल, वाढती स्पर्धा व त्यातून येणाºया ताणतणावामुळे मानसिक उपचारांची गरज वाढत आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांमधील आत्महत्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे आणि हे टाळण्यासाठी मानसिक आरोग्याची जपवणूक गरजेची असल्याचेही ते म्हणाले. डॉ. भावे यांनी आत्महत्या थांबवण्यासाठी मनोरुग्णांचे पुनर्वसन ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत मांडले.
-मेंदू, मन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू
डॉ. ठाकरे म्हणाले, मेंदू आणि मन हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मेंदूच्या आजारामुळे विविध प्रकारचे मानसिक लक्षणे दिसतात. उदा. डिमेंशियाचा आजारात झोपेचे आजार, डोकेदुखी. विविध तपासण्या करून देखील निदान न होणारे लक्षणे, हे मानसिक आजाराची असू शकतात.
-अशी आहे नवीन कार्यकारणी
सोसायटीच्या नवीन कार्यकारणीत अध्यक्ष डॉ. मनीष ठाकरे, सचिव डॉ. महाजन, सहसचिव डॉ. श्रेयस मांगिया व डॉ. मौसम फिरके, कोषाध्यक्ष डॉ. आशिष कुथे तर सदस्य म्हणून डॉ. श्रीकांत निंभोरकर, डॉ. प्रांजली भगत, डॉ. लक्ष्मी, डॉ. मोनीषा दास, डॉ. रवी ढवळे, डॉ. कुमार कांबळे यांचा सहभाग आहे. संचालन डॉ. सोनाक्षी जारवा व डॉ. प्रांजली भगत यांनी केले. आभार डॉ. महाजन यांनी मानले.