‘टॉप फाईव्ह’मध्ये नोटा : साडेसोळा हजार मतदारांची ‘नोटा’ला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 08:16 PM2019-05-24T20:16:30+5:302019-05-24T20:18:53+5:30
विदर्भासह संपूर्ण देशात ‘मोदी’लाट असताना नागपूर जिल्ह्यात मात्र एक दोन नव्हेतर दोन्ही लोक सभा मतदारसंघ मिळून तब्बल १६ हजार ४९८मतदारांनी कुणालाही मतदान न करता नकारात्मक मताचा (नोटा) पर्याय निवडला. दोन्ही मतदारसंघाचा विचार करताना नोटाला मिळालेल्या मतांची संख्या ही ‘टॉप फाईव्ह’ मध्ये येणारी आहे. विशेष म्हणजे नागपूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदारांनी अडीचपट नोटाचा वापर केला. २०१४ मध्ये ८२७६ मतदारांनी नोटाचा वापर केला होता. यावेळी मात्र ही संख्या दुप्पट झालेली दिसते. नोटाची ही वाढती संख्या लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेला चिंतन करायला लावणारी आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: विदर्भासह संपूर्ण देशात ‘मोदी’लाट असताना नागपूर जिल्ह्यात मात्र एक दोन नव्हेतर दोन्ही लोक सभा मतदारसंघ मिळून तब्बल १६ हजार ४९८मतदारांनी कुणालाही मतदान न करता नकारात्मक मताचा (नोटा) पर्याय निवडला. दोन्ही मतदारसंघाचा विचार करताना नोटाला मिळालेल्या मतांची संख्या ही ‘टॉप फाईव्ह’ मध्ये येणारी आहे.
विशेष म्हणजे नागपूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील मतदारांनी अडीचपट नोटाचा वापर केला. २०१४ मध्ये ८२७६ मतदारांनी नोटाचा वापर केला होता. यावेळी मात्र ही संख्या दुप्पट झालेली दिसते. नोटाची ही वाढती संख्या लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेला चिंतन करायला लावणारी आहे.
निवडणूक आयोगाने मतदारांना नकारात्मक मतदानाचा पर्याय दिला असून त्याचा वापर यावेळीही लोक सभा निवडणुकीत क रण्यात आला आहे. रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एक ही उमेदवार पसंतीचा नसेल तर त्यांना मत न देता नकारात्मक मतदान क रण्याची सोय प्रत्येक मतदान यंत्रात उपलब्ध क रून देण्यात आली होती. नागपूर मतदारसंघात ४५७८ मतदारांनी तर रामटेक मतदारसंघात तब्बल ११९२० मतदारांनी नोटा या पर्यायाचा वापर केला.
नागपूर लोक सभेच्या रिंगणात ३० तर रामटेक लोक सभा मतदारसंघात १६ उमेदवार रिंगणात होते. यात दिग्गज उमेदवारांचा समावेश होता.
मात्र या ४६ उमेदवारांमधून एक ही उमेदवार या मतदारांच्या पसंतीस उतरला नाही, असे नोटाची बटन दाबणाऱ्या मतदारांच्या संख्येवरू न वाटते. विशेष म्हणजे सुशिक्षित आणि शहरी भागात ‘नोटा’चा पर्याय अधिक होईल असा अंदाज व्यक्त क रण्यात येत होता. मात्र नागपूरच्या तुलनेत रामटेक मध्ये या पर्यायाचा वापर अधिक क रण्यात आल्याचे आक डेवारी सांगते. त्यामुळे ग्रामीण मतदारही अधिक जागृत आणि मंथन करणारा झाल्याचे दिसून येत आहे.
असे झाले ‘नोटा’ मतदान
मतदार संघ २०१४ २०१९
नागपूर ३४६० ४५७८
रामटेक ४८१६ ११९२०
---------------------------------------------
एकूण ८२७६ १६४९८
पोस्टल बॅलेटमध्येही १६० नोटा
निवडणूक ड्युटी लागलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच सैनिकांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करण्याची सोय करून दिली जाते. मात्र, पोस्टल बॅलेटमध्येही १६० मतदारांनी नोटाचा वापर केला. नागपुरात ४० तर रामटेकमध्ये १२० मतदारांनी नोटाला पसंती दिली.
संघानेही केले होते आवाहन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘नोटा’ वापरू नका, असे आवाहन केले होते. सरसंघचालक मोहन भागवत यांनी विजयादशमी सोहळ्यात तसेच दिल्ली येथील तीन दिवसीय व्याख्यानमालेतही या विषयाला हात घातला होता.