नारायणा विद्यालयमची उल्लेखनीय कामगिरी
By admin | Published: May 22, 2016 02:53 AM2016-05-22T02:53:05+5:302016-05-22T02:53:05+5:30
यंदाच्या सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नारायण विद्यालयमच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
शाळेचा १०० टक्के निकाल : विज्ञान व कॉमर्समध्ये उत्तम गुण
नागपूर : यंदाच्या सीबीएसई परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून नारायण विद्यालयमच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
एकूण १०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. शाळेचा १०० टक्के निकाल लागला आहे. सर्व विद्यार्थ्यांनी ६० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. विज्ञान शाखेत हरीकुमार पी. नायर आणि श्रेयस्ता देठे या विद्यार्थ्यांनी ९३ टक्के गुण संपादन केले. द्वितीय क्रमांक मिळविलेला सुमेध गोसावीने ८९ टक्के गुण मिळाले.
कॉमर्स वर्गवारीत गायत्री सरवटे शाळेत टॉपर आली असून तिने ९३.८ टक्के मिळविले. द्वितीय क्रमांकाच्या हृषिकेश पाचबुधे ८९ टक्के आणि तृतीय आशिष अग्रवालने ८९.६ टक्के गुण संपादन केले. इंग्रजी विषयात दिशनीत कौर, हरीकुमार नायर आणि गायत्री सरवटेने ९३ टक्के गुण मिळाले. श्रेयस्ता देठे आणि अंकित कुमार सनोदियाने गणितात ९५ टक्के, फिजिक्समध्ये हरीकुमार नायर, श्रेयस्ता देठे, पूनम जैन, संध्या पवार, विनेश मुनघाटे, दिशनीत कौर, मुकुल कडस्कर, निखील तल्हार, केतन गांधी, मोहित मोहिते, प्रसाद औरंगाबादकर, संयुक्ता साठवणे या विद्यार्थ्यांनी ९५ टक्के गुण मिळविले. यासह केमेस्ट्रीमध्ये हरीकुमार नायर श्रेयस्ता देठे, सुमेध गोसावी, संध्या पवार, मुकुल कडस्कर, केतन गांधी या विद्यार्थ्यांना ९५ टक्के गुण मिळाले.
इंजिनिअरिंग ग्राफिक्समध्ये संयुक्ता साठवणेला ९८ टक्के, बॉयोलॉजीमध्ये योमिका वर्माला ९८ टक्के आणि फिजिक्स एज्युकेशनमध्ये सुशांत दंडारेने ९८ टक्के गुण मिळाले आहेत.
तर कॉम्प्युटर सायन्समध्ये दिशनीत कौर आणि गायत्री सरवटेला ९१ टक्के गुण मिळाले आहेत. (वा. प्र.)