आयआयटी-पॉर्इंटची उल्लेखनीय कामगिरी
By Admin | Published: June 24, 2015 03:24 AM2015-06-24T03:24:35+5:302015-06-24T03:24:35+5:30
नागपूर, मुंबई आणि कोटा येथील आयआयटी-पॉर्इंटच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
नागपूर : नागपूर, मुंबई आणि कोटा येथील आयआयटी-पॉर्इंटच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अलीकडेच घोषित झालेल्या निकालात आयआयटी जेईई-अॅडव्हान्स परीक्षेत नागपूर सेंटरच्या विद्यार्थ्यांनी देशातील सर्वात मोठ्या इंजिनिअरिंग परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.
अखिल भारतीय स्तरावर पहिल्या १००० विद्यार्थ्यांमध्ये संस्थेच्या तीन जणांनी आणि चार हजार विद्यार्थ्यांमध्ये एकूण सहा जणांनी स्थान मिळविले आहे. नागपूर सेंटरच्या क्लासरूम कार्यक्रमातून निवड झालेल्यांमध्ये प्रणय महाजन (एआयआर ३५०), वैभव नितनवरे (एआयआर ५७३), नीलेश खापरे (एआयआर ६३८), निहान साखरे (एआयआर १६५८), निवेदिका गायकवाड (एआयआर २०७९) आणि पीयूष वरयानी (एआयआर ३६२३) यांचा समावेश आहे. याशिवाय अन्य विद्यार्थ्यांनीही जेईई-अॅडव्हान्समध्ये यश संपादन केले आहे.
बारावी बोर्डाच्या परीक्षेतही आयआयटी-पॉर्इंटच्या विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहे. वैभव नितनवरे ९५.०२ टक्के, श्रीकेश नरुले ९३.२० टक्के, ईशिता धीमन ९३ टक्के, तनुश्री अधिकारी ९१.३८, गौरव चरपे ९१ टक्के आदींचा समावेश आहे. याशिवाय दोन वर्षीय क्लासरूम कार्यक्रमात बोर्ड आणि जेईई मेन्स व अॅडव्हान्स परीक्षेतही यश संपादन केले आहे. आयआयटी-पॉर्इंट क्लासरूम सिनक्रोनाईज ई-ट्यूटर कार्यक्रमात आयआयटी-अॅडव्हान्स परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर अक्षित रेड्डीने २८ वे स्थान, प्रखर गुप्ताने २१५ वे, आयुषी गर्गने ७१६, दिव्यांश बन्सलने ११५५ आणि श्याम मालवीयने ४०९४ वे मिळविले आहे. याशिवाय शेकडो विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय संस्थेचे कालबद्ध अध्यापन कार्यक्रम, निवडक अध्ययन सामग्री आणि अनुभवी प्राध्यापकांच्या समर्पित सेवेला जाते. मॉक टेस्टचे नियमित आयोजन करण्यात येते. ई-ट्यूटर सुविधेत सर्व विद्यार्थी एकाच क्लासरूम लेक्चरमध्ये आपल्या सुविधेनुसार वेळोवेळी अध्ययन करू शकतो.
संस्थेत निवासी डे बोर्डिंगसह वाहतुकीची सुविधा आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकाग्रतेने अभ्यास करता येतो. मुंबई पाच सुविधायुक्त सेंटर आहेत. संस्थेचे कॉर्पोरेट कार्यालय कोटा येथे आहे. इयत्ता आठवीपासूनच विद्यार्थ्यांना शिक्षण क्षमतेचा विकास करण्यात येतो. सर्वांगीण विकास हे संस्थेचे ध्येय आहे. स्पर्धात्मक परीक्षांसह जीवनातही यशस्वी होण्यावर संस्था मार्गदर्शन करते. आयआयटी-पॉर्इंटचे नागपूर सेंटर सांस्कृतिक संकुल, सीताबर्डी येथे आहे. (वा.प्र.)