नागपुरातील ३४ सोनोग्राफी सेंटरला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 03:46 PM2018-05-05T15:46:33+5:302018-05-05T15:46:42+5:30

शासन निर्देशानुसार नागपूर शहरातील सर्व ५८० सोनोग्राफी सेंटरची महापालिकेतर्फे २ ते २७ एप्रिलदरम्यान पथकामार्फत आकस्मिक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्रुटी आढळून आलेल्या ३४ सोनोग्राफी सेंटरला नोटीस बजावण्यात आली आहे.

Notice to 34 Sonography Center in Nagpur | नागपुरातील ३४ सोनोग्राफी सेंटरला नोटीस

नागपुरातील ३४ सोनोग्राफी सेंटरला नोटीस

Next
ठळक मुद्देपीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन : जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासन निर्देशानुसार नागपूर शहरातील सर्व ५८० सोनोग्राफी सेंटरची महापालिकेतर्फे २ ते २७ एप्रिलदरम्यान पथकामार्फत आकस्मिक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान त्रुटी आढळून आलेल्या ३४ सोनोग्राफी सेंटरलानोटीस बजावण्यात आली आहे. तपास पथकामध्ये महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी व महसूल विभाग आणि अन्य अधिकाऱ्यांचा सहभाग २२होता. या तपासणी मोहिमेत शहरातील सोनोग्राफी सेंटर, रेडिओलॉजी, गायनाकोलॉजी, इको मशीन, नेत्र तपासणी मशीन, एमआरआय, सिटी स्कॅन व बीस्कॅन मशीन तपासणी करण्यात आली होती.
तपासणीचा आढावा घेण्यासाठी पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समिती बैठक गुरुवारी धरमपेठ येथील मुख्यालयात पार पडली. यावेळी महापालिकेच्या नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, समिती सदस्य प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चैतन्य शेंबेकर, राज्य शासन सल्लागार समितीच्या सदस्य डॉ. वर्षा ठवळे, महाराष्ट्र राज्य रेडिओलॉजी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत ओंकार, समितीचे सदस्य व मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, डॉ. विनय टुले, वसुंधरा स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधी वीणा खानोरकर आदी सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. तपासणीदरम्यान ३४ सेंटरवर अनेक त्रुटी आढळून आल्या. सेंटरवर कायद्याचे पुस्तक नव्हते, मशीनवर एमआरसी नंबर नव्हते, एफ फॉर्मवर अनेक त्रुटी आढळल्या व अनेक सेंटरवर तपासणीच्या नोंदी नव्हत्या.
तसेच सोनोग्राफी मशीन इतरत्र हलविताना समितीची पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे या तपासणीदरम्यान निदर्शनास आल्याने संबंधितांना नोटीस देण्याचा निर्णय घेण्यात आला.

Web Title: Notice to 34 Sonography Center in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.