मनपाची जागा नसतानाही नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2017 12:31 AM2017-11-05T00:31:06+5:302017-11-05T00:31:29+5:30

वाठोडा व तरोडी भागात वास्तव्यास असलेल्या अनेक खसºयातील नागरिकांना राहती घरे व प्लॉट जागा खाली करण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत.

Notice in case of absence of meeting | मनपाची जागा नसतानाही नोटिसा

मनपाची जागा नसतानाही नोटिसा

googlenewsNext
ठळक मुद्देकारवाईच अवैध : वाठोडा येथील भूखंडधारकांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वाठोडा व तरोडी भागात वास्तव्यास असलेल्या अनेक खसºयातील नागरिकांना राहती घरे व प्लॉट जागा खाली करण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. जागेचा ताबा न सोडल्यास पोलिसांच्या व अतिक्रमण विभागाच्या मदतीने घरे पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यात वाठोडा येथील भूमापन क्र मांक १७८/१ मधील ०.७४ हेक्टर जागा ही महापालिकेच्या मालकीची नाही. मालकी हक्काबाबत शहानिशा न करताच येथील भूखंडधारकांनाही महापालिकेने नोटिसा बजावल्याचा आरोप भूखंडधारकांनी केला आहे.
माँ शुभलक्ष्मी लॅन्ड डेव्हलपर्स यांच्याकडून ७८ लोकांनी १० वर्षांपूर्वी भूखंड विकत घेतले आहेत. या भूखंडधारकांना २०१२ मध्ये महापालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. याविरोधात भूखंडधारकांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात महापालिका मालकी हक्काबाबतची कागदपत्रे सादर क रू न शकल्याने न्यायालयाने या प्रकरणातून महापालिकेचे नाव वगळण्याचा निर्णय दिला होता. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महापालिकेने अपील केले नव्हते, म्हणजेच ही जागा महापालिकेच्या मालकीची नव्हती, अशी माहिती अ‍ॅड. यशवंत मेश्राम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
जमिनीच्या सातबारावर शशिकला परतेकी, सुनीता रेवतकर, मारोती तडस, बनाबाई तडस, ज्ञानेश्वर तडस, सुनीता तडस, प्रीती व कुंदा मुरलीधर तडस आदींची नावे आहेत. परंतु वाठोडा व तरोडी भागातील भूखंडधारकांना सरसकट जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी येथील भूखंडधारकांना महापालिकेने मालमत्ता कर आकारणीची देयके पाठविलेली आहेत.
जी जागा महापालिकेच्या मालकीची नाही अशा जागेवरील भूखंडधारकांना नोटिसा बजावल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे. येथे बहुसंख्य लोकांनी घरे बांधलेली आहेत तर काही भूखंड खाली आहेत. वाठोडा परिसरात कौशल्य विकास केंद्र व क्र ीडा संकुल उभारण्यासाठी या भागातील नागरिकांना महापालिकेने २४ तासात घरे पाडून जागा खाली करण्याचे निर्देश दिले आहे. परंतु भूमापन क्रमांक १७८/१ हा महापालिकेच्या मालकीचा नाही तसेच या जागेवर त्यांचा ताबाही नाही. असे असतानाही नोटिसा बजावलेल्या आहेत. यात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी महापालिका अधिकाºयांना न्यायालयामार्फत नोटीस बजावणार असल्याची माहिती मेश्राम यांनी दिली. पत्रकार परिषदेला आशिष खेडकर, राजू देशभ्रतार, बंडू बोरकर, मोरेश्वर मेश्राम, सुगराम गोडघाटे आदी उपस्थित होते.
नागरिकांत दहशत
महापालिकेने २०१२ मध्ये या भागातील लोकांना नोटीस बजावून जागेची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यांनी जागा खरेदी केल्याबाबतची कागपत्रे सादर केली होती. त्यानंतर ही कारवाई थंडबस्त्यात पडली होती. दोन दिवसापूर्वी महापालिकेने या भागातील ३५० घरमालक व १५० झोपडपट्टीधारकांना पुन्हा नोटीस बजावून जागा खाली करण्याचे निर्देश दिले आहे. पक्की घरे पाडण्यात येणार असल्याचा इशारा दिल्याने नागरिकांत दहशत आहे.

Web Title: Notice in case of absence of meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.