‘मनोरा’ रिकामे करण्यासाठी आमदारांना लवकरच नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:11 PM2017-12-15T22:11:03+5:302017-12-15T22:22:27+5:30

मुंबई येथील मनोरा आमदार निवास इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात मंत्रालय परिसर येथे आमदारांना निवासाची व्यवस्था करण्यासाठी विभागातर्फे कार्यवाही करण्यात येत आहे. येत्या महिन्याभरात आमदारांना नवीन रचनेबाबत माहिती दिली जाईल व खोल्या रिकाम्या करण्यासाठी नोटीस दिल्या जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

Notice to the MLAs to vacate 'Manora' soon | ‘मनोरा’ रिकामे करण्यासाठी आमदारांना लवकरच नोटीस

‘मनोरा’ रिकामे करण्यासाठी आमदारांना लवकरच नोटीस

Next
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहितीप्रत्येकी ५० हजार रुपये भाडे देणार

आॅनलाईन लोकमत
नागपूर : मुंबई येथील मनोरा आमदार निवास इमारत पाडून त्या ठिकाणी नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात मंत्रालय परिसर येथे आमदारांना निवासाची व्यवस्था करण्यासाठी विभागातर्फे कार्यवाही करण्यात येत आहे. येत्या महिन्याभरात आमदारांना नवीन रचनेबाबत माहिती दिली जाईल व खोल्या रिकाम्या करण्यासाठी नोटीस दिल्या जातील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
पाटील म्हणाले, मनोरा आमदार निवासाची इमारत पाडण्याचा निर्णय घेऊन ती नव्याने बांधण्याचे काम केंद्र सरकारच्या कंपनीला दिले आहे. येथे राहणाऱ्या आमदारांची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी घाटकोपर येथे ११०० फ्लॅट पाहण्यात आले होते. पण काहींनी त्यावर असहमती दर्शविली. त्यामुळे आता मंत्रालय परिसरात असलेल्या इतर आमदार निवासमधील प्रत्येक आमदाराला आता दोनऐवजी एकच खोली दिली जाईल व दुसऱ्या  खोलीचे ५० हजार रुपये भाडे दिले जाईल. रिकाम्या होणाऱ्या  दुसऱ्या  खोलीत मनोऱ्यातील आमदारांना स्थलांतरित केले जाईल. यानंतर मनोरा इमारतीचे एक-एक टॉवर पाडून पुनर्बांधणीचे काम केले जाईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

एशियाटिक सोसायटीमधील गळतीची चौकशी
 मुंबई येथील सेंट्रल लायब्ररी एशियाटिक सोसायटीमधील गळती महिनाभरात कायमस्वरूपी काढण्यात येईल. या गळतीच्या दुरुस्तीचे काम व्यवस्थित न झाल्यास त्याची चौकशी करण्यात येईल. दोषी आढळणाऱ्या  कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्यात येईल, असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिले.
भाजपाचे अतुल भातखळकर यांनी सेंट्रल लायब्ररी एशियाटिक सोसायटी येथे छतामधून पाणी गळती होऊन शेकडो दुर्मीळ पुस्तके भिजल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना पाटील म्हणाले, येत्या तीन आठवड्यात कमी कालावधीची निविदा काढून गळती काढण्याचे काम करण्यात येईल. या लायब्ररीच्या पायऱ्यांची दुरुस्ती ३१ डिसेंबर, २०१७ पूर्वी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री गणपतराव देशमुख, राजेश टोपे, पतंगराव कदम, आशिष शेलार यांनी भाग घेतला.

Web Title: Notice to the MLAs to vacate 'Manora' soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.