नागपूरच्या पूनम मॉलला नोटीस; ३२ कोटींची थकबाकी : मनपाची लिलावाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 08:35 PM2019-01-24T20:35:05+5:302019-01-24T20:36:25+5:30

शहरातील ४५ मालमत्ताधारकांकडे तब्बल १२५ कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता विभागाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. यातूनच वर्धमाननगर येथील पूनम मॉलवर ३२ कोटीची थकबाकी असल्याने महापालिकेने मॉलला नोटीस बजावून हुकूमनामा काढून लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.

Notice to Poonam Mall of Nagpur; 32 crores outstanding: NMC ready to auction | नागपूरच्या पूनम मॉलला नोटीस; ३२ कोटींची थकबाकी : मनपाची लिलावाची तयारी

नागपूरच्या पूनम मॉलला नोटीस; ३२ कोटींची थकबाकी : मनपाची लिलावाची तयारी

Next
ठळक मुद्दे कंटेनर डेपोकडे १८ कोटी : सेंट्रल मॉलकडे ११ कोटी तर एम्प्रेस मॉलकडे १८ कोटींची थकबाकी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील ४५ मालमत्ताधारकांकडे तब्बल १२५ कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे. थकबाकी वसुलीसाठी मालमत्ता विभागाने कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. यातूनच वर्धमाननगर येथील पूनम मॉलवर ३२ कोटीची थकबाकी असल्याने महापालिकेने मॉलला नोटीस बजावून हुकूमनामा काढून लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे.
कंटेनर डेपोकडे १८ कोटींची थकबाकी असल्याने त्यांच्यावरही कारवाईची तयारी केली आहे. सेंट्रल मॉलकडे ११ कोटींची थकबाकी आहे. परंतु मॉल व्यवस्थापनाने याविरोधात अपील केले असून प्रकरणावर सुनावणी घेतली जाणार आहे. तसेच एम्प्रेस मॉलकडे १८ कोटींची थकबाकी आहे. परंतु प्रकरण उच्च न्यायालयात आहे. यावरील सुनावणी होताच महापालिकेकडून कारवाई केली जाणार आहे. शहरातील मोठ्या मालमत्ताधारकांकडे ३०० कोटींची थकबाकी आहे. गेल्या काही महिन्यांत यातील ३० कोटी वसूल करण्यात आले. परंतु अजूनही २७० कोटींची थकबाकी कायम आहे. थकबाकीदारात शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे.
२०१८-१९ या वर्षात मालमत्ता कराचे ५०९ कोटींच्या वसुलीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. २४ जानेवारीपर्यंत १५० कोटींची वसुली झाली आहे. उर्वरित ७० दिवसांत ३५९ कोटींची वसुली करावयाची आहे. याचा विचार करता मालमत्ता विभागाने थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. नोटीस बजावल्यानंतरही थकबाकी न भरल्यास हुकूमनामा काढून लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पूनम मॉलला नोटीस बजावून हुकूमनामा जाहीर केला आहे. सहायक आयुक्त (मालमत्ता) मिलिंद मेश्राम यांनी थकबाकीदारांच्या विरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती दिली.
शासकीय कार्यालयांकडे ४५ कोटी
केंद्र व राज्य सरकारच्या कार्यालयांकडे तब्बल ४५ कोटींची थकबाकी आहे. मालमत्ता विभागाने वारंवार नोटीस बजावल्यानंतरही थकबाकी वसुलीला प्रतिसाद मिळत नाही. याचा विचार करता जप्तीची कारवाई करण्याची तयारी मालमत्ता विभागाने सुरू केली आहे.
मोठ्या मालमत्तांमुळे थकबाकीचा आकडा फुगला
मालमत्ता कराची २७० कोटींची थकबाकी आहे. परंतु यात चार ते पाच मालमत्ताधारकांकडेच १५० कोटींची थकबाकी आहे. तसेच शासकीय कार्यालयाकडे ४५ कोटींची थकबाकी आहे. याचा विचार करता मोठ्या मालमत्ताधारकांमुळे थकबाकीचा आकडा फुगला आहे.

Web Title: Notice to Poonam Mall of Nagpur; 32 crores outstanding: NMC ready to auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.