नदी पात्रातील झोपडपट्टीधारकांना नोटीस

By admin | Published: May 15, 2016 02:47 AM2016-05-15T02:47:59+5:302016-05-15T02:47:59+5:30

पावसाळ्यात पिवळी नदी व चांभार नाला परिसरातील वस्त्यांना पुराचे पाणी शिरण्याचा धोका असतो.

Notice to slum dwellers in river bed | नदी पात्रातील झोपडपट्टीधारकांना नोटीस

नदी पात्रातील झोपडपट्टीधारकांना नोटीस

Next

शहरातील १२१ ठिकाणे धोकादायक : ३८०० कुटुंबांना धोका
नागपूर : पावसाळ्यात पिवळी नदी व चांभार नाला परिसरातील वस्त्यांना पुराचे पाणी शिरण्याचा धोका असतो. अनेकदा प्राणहानी होण्याचा धोका असतो. ही बाब विचारात घेता नदी व नाल्यातील गाळ काढण्यासोबतच नदीपात्रातील झोपडपट्टीधारकांचे अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जाणार आहे. महापालिकेच्या मंगळवारी व आशीनगर झोन कार्यालयांनी नदी पात्रातील अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्याला सुरुवात केली आहे.
महापालिके च्या आपत्ती निवारण विभागाने पावसाळ्यात पाणी शिरण्याची शक्यता असलेली नागपूर शहरातील १२१ ठिकाणे व वस्त्या धोकादायक ठरविल्या आहेत. अतिवृष्टी व पूर आल्यास या वस्त्यात पाणी शिरण्याचा धोका असतो. यामुळे ३८०० कुटुंंबांना धोका निर्माण होतो. दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात या वस्त्यांतील लोकांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यापूर्वी नियोजन करण्यात आले आहे. आपत्ती निवारणासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत.
नदी व नाल्यातील गाळ व कचरा काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. पिवळी नदी काठावर वा नदीपात्रात ४०० अतिक्रमणे आहेत. गंगानगर, गोदावरीनगर, सूरजनगर, पलोटीनगर आदींचा यात समावेश आहे. यातील ३०० झोपडपट्टीधारकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)

नियमाचे उल्लंघन करून बांधकाम
नियमानुसार नदी पात्रात ५०० मीटर परिसरात कोणत्याही स्वरुपाचे बांधकाम करता येत नाही. परंतु शहरातील सर्वच नद्यांच्या काठावर अतिक्रमण करण्यात आले आहे. नियमाचे सर्रास उल्लंघन करण्यात आले आहे. काही भागातील अतिक्रमण वर्षानुवर्षे असल्याने ते काढणे शक्य नाही. परंतु अलिकडील काही वर्षात वसलेल्या झोपड्या हटविण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.
पिवळी नदी पात्रात २२०० अतिक्र मण
आशीनगर झानेच्या हद्दीतील पिवळी नदी पात्रात २२०० अतिक्र मण असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना आठवडाभरात अतिक्रमण काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच रामदासपेठ, काचीपुरा झोपडपट्टीचा भाग, धरमपेठ विद्यालयाच्या मागील भाग, तेलंगखेडी तलावाचा परिसर, शीलानगर, गवळीपुरा, पांढराबोडी, हजारी पहाड, गांधीनगर झोपडपट्टी, संजयनगर, शिवाजीनगर, आदर्शनगर, ताजनगर, वांजरा, वांजरी, नारी, झिंगाबाई टाकळी, सक्करदरा भागातील झोपडपट्ट्या, पोहरा नदी काठावरील वस्त्यांना पावसाळ्यात पाणी शिरण्याचा धोका असतो.

Web Title: Notice to slum dwellers in river bed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.