कुख्यात आंबेकरच्या भाच्याला मारहाण करून लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:58 PM2019-02-19T23:58:41+5:302019-02-20T00:01:02+5:30

उपराजधानीतील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा भाचा शैलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३२) याला सहा सशस्त्र गुंडांनी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. त्याच्या गल्ल्यातील १५ हजार रुपये, सोन्याची साखळी आणि चांदीचे हातकडेही हिसकावून नेले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली.

The notorious Ambekar's nephew was robbed and looted | कुख्यात आंबेकरच्या भाच्याला मारहाण करून लुटले

कुख्यात आंबेकरच्या भाच्याला मारहाण करून लुटले

Next
ठळक मुद्देनंदनवनमध्ये सशस्त्र गुंडांचा हैदोस : रॉडने मारले, रोख आणि सोनसाखळी हिसकावून नेली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उपराजधानीतील कुख्यात गुंड संतोष आंबेकर याचा भाचा शैलेश ज्ञानेश्वर केदार (वय ३२) याला सहा सशस्त्र गुंडांनी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. त्याच्या गल्ल्यातील १५ हजार रुपये, सोन्याची साखळी आणि चांदीचे हातकडेही हिसकावून नेले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री ९.३० वाजता ही घटना घडली.
शैलेश केदार याने पोलिसांना तक्रार नोंदविताना दिलेल्या माहितीनुसार, त्याने काही महिन्यांपूर्वी नंदनवनमधील व्यंकटेश कॉलनीत टी स्टॉल लावला. त्याच्या टी स्टॉलवर नेहमी ग्राहकांची गर्दी असते. रविवारी रात्री शैलेश त्याचे मित्र रवी हेडावू आणि आदर्श सातपुते सोबत ग्राहकांना चहा व मॅगी बनवून देत असताना आरोपी आकिब ऊर्फ सोनू, गणेश, भोला, पीयूष आणि त्याचे दोन साथीदार आले. ते सर्व चहा प्यायले. त्यानंतर शैलेशने त्यांना चहाचे पैसे मागितले असता आरोपींनी शैलेशला ‘तू यहां कबसे ठेला लगाता, हम यहा के दादा है, हमारे आदमी से कभी पैसे नही लेने का,’ असे म्हणत आरोपीने लोखंडी रॉडने शैलेशला मारहाण केली. एवढेच नव्हे तर तलवार काढून शैलेशला जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी तसेच हातातील चांदीचे कडे आणि गल्ल्यातील १४,८०० रुपये हिसकावून घेतले. या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. उपचार करून घेतल्यानंतर शैलेशने नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केला. वृत्त लिहिस्तोवर कुणालाही अटक झाली नव्हती. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
डॉन का भांजा अन् चहाटपरी...!
नागपूरचा डॉन म्हणून कुख्यात असलेल्या संतोष आंबेकरच्या भाच्याचे नाव शैलेश केदारच असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. शैलेशने पोलिसांकडे तक्रार नोंदविताना आंबेकर आपला मामा असल्याचे सांगितल्याचे ठाणेदार विनायक चव्हाण यांनी लोकमतला सांगितले आहे. ही घटना खरी असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले आहे. मात्र, केदारने चहा टपारीसारखा १० - २० रुपये गोळा करणारा व्यवसाय सुरू करण्याची बाब खुद्द पोलिसांनाही पटेनाशी झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्वच अँगल तपासत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Web Title: The notorious Ambekar's nephew was robbed and looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.