कुख्यात क्रिकेट बुकी कुणाल सचदेव विमानतळ परिसरात जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 09:53 PM2023-05-30T21:53:24+5:302023-05-30T21:53:56+5:30

Nagpur News कुख्यात क्रिकेट बुुकी कुणाल सचदेव याला सोनेगाव पोलिसांनी विमानतळाजवळ जेरबंद केले.

Notorious cricket bookie Kunal Sachdev arrested in airport area | कुख्यात क्रिकेट बुकी कुणाल सचदेव विमानतळ परिसरात जेरबंद

कुख्यात क्रिकेट बुकी कुणाल सचदेव विमानतळ परिसरात जेरबंद

googlenewsNext

नागपूर : कुख्यात क्रिकेट बुुकी कुणाल सचदेव याला सोनेगाव पोलिसांनी विमानतळाजवळ जेरबंद केले. कुणालला अटक झाल्याचे कळाल्याने नागपुरातील लकडगंज, खामला, जरीपटका, तहसील, कोतवाली, अंबाझरी आणि सदर परीसरातील बुकींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, कुणाल सचदेव हा भूमिगत राहून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याची बेटिंग करतो. प्रारंभी कालूच्या मदतीने त्याने क्रिकेट सट्टेबाजीची सुरुवात केली होती. कोट्यवधी रुपये कमविल्यानंतर त्याने आता गोवा, दिल्लीतून आंतरराष्ट्रीय बुकींशी व्यवहार सुरु केल्याची माहिती आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेदरम्यान त्याने देशातील अनेक राज्यातील क्रिकेट बुकींची खायवाडी-लगवाडी करीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. आज तो नागपूरला परत येणार होता, अशी माहिती सोनेगाव पोलिसांना मिळाली. तो दुपारी विमानतळावर येताच पोलिसांनी सापळा रचला. त्याला विमानतळ परीसरातूनच अटक करण्यात आली. त्याच्याकडून दोन मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आले. डीसीपी अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनात पोलीस आरोपी सचदेवची चाैकशी करीत होते.

अनेक बाबींचा खुलासा होणार
रात्री ९ पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी गुन्हे शाखेचे किशोर पर्वते यांनी जामठा क्रिकेट मैदानावरून चार क्रिकेट सट्टेबाजांना अटक केली होती. त्या सट्टेबाजांचासुद्धा संबंध कुणाल सचदेव यांच्याशी संबंध असल्याची चर्चा आहे. सचदेवच्या अटकेच्या संबंधाने वृत्त लिहिस्तोवर अनेक बाबींचा खुलासा झाला नव्हता. चाैकशीत तो होऊ शकेल, असे डीसीपी जैन यांनी सांगितले.
 

Web Title: Notorious cricket bookie Kunal Sachdev arrested in airport area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.