कुख्यात गुन्हेगार दाेन वर्षांसाठी हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:08 AM2021-09-03T04:08:55+5:302021-09-03T04:08:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : वारंवार सूचना व संधी देऊनही कुख्यात गुन्हेगाराच्या वर्तनात बदल हाेत नसल्याने तसेच त्याच्या विराेधात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : वारंवार सूचना व संधी देऊनही कुख्यात गुन्हेगाराच्या वर्तनात बदल हाेत नसल्याने तसेच त्याच्या विराेधात गंभीर गुन्ह्यांची नाेंद असल्याने नागपूर शहर पाेलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी त्या गुन्हेगारास दाेन वर्षांसाठी नागपूर शहर व नागपूर ग्रामीणमधील तीन पाेलीस ठाण्यांच्या हद्दीतून हद्दपार केले आहे. त्याला रामटेक शहरात साेडण्यात आल्याची माहिती ठाणेदार राहुल शिरे यांनी दिली.
नीरज ऊर्फ लकी वरदराज पिल्ले (२९, शास्त्री मंच, कादर झेंडा, कामठी) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या विराेधात कामठी (जुनी) पाेलीस ठाण्यात शस्त्राच्या धाकावर नागरिकांना दमदाटी करणे, त्यांना मारहाण करणे, अमली पदार्थांची विक्री करणे, अश्लील भाषेत बाेलणे व विनाकारण शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, विनाकारण प्राणघातक हल्ला करणे, दराेडा टाकणे, लूटमार करणे यासह अन्य गंभीर गुन्ह्यांची नाेंद आहे.
त्याच्या या वर्तनामुळे शहरातील शांतता भंग हाेत असल्याने पाेलिसांनी त्याला अनेकदा सूचना देऊन वर्तनात सुधारणा करण्याची संधी दिली. त्याच्या वर्तनात बदल हाेत नसल्याने ठाणेदार राहुल शिरे यांनी त्याला शहरातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव तयार करून पाेलीस उपायुक्त नीलाेत्पल यांच्याकडे पाठविला. नीलाेत्पल यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन पाेलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे पाठविला. त्यांनी मंजुरी देताच नीरजला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले.
...
रामटेक शहरात वास्तव्य
आराेपी नीरज पिल्ले यास नागपूर शहर पाेलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील सर्व पाेलीस ठाणे तसेच नागपूर ग्रामीण मधील खापरखेडा (ता. सावनेर), कन्हान (ता. पारशिवनी) व माैदा पाेलीस ठाण्यातून हद्दपार करण्यात आले. त्यामुळे त्याला लगेच ताब्यात घेऊन रामटेक शहरातील त्याच्या नातेवाईकांकडे साेडण्यात आले. शिवाय, याबाबत रामटेक पाेलिसांना सूचना देण्यात आली, अशी माहिती ठाणेदार राहुल शिरे यांनी दिली.