कुख्यात अवैध दारूविक्रेता ‘एमपीडीए’अंतर्गत स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:07 AM2021-07-24T04:07:33+5:302021-07-24T04:07:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पाटणसावंगी : माेहफुलाची दारू काढून अवैधरीत्या वाहतूक करणे व विकणे तसेच तरुणी व महिलांना त्रास देणाऱ्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पाटणसावंगी : माेहफुलाची दारू काढून अवैधरीत्या वाहतूक करणे व विकणे तसेच तरुणी व महिलांना त्रास देणाऱ्या अवैध दारूविक्रेत्याविरुद्ध सावनेर पाेलिसांनी जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशान्वये ‘एमपीडीए’ अन्वये कारवाई केली. त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले असून, त्याची गुरुवारी (दि. २२) नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
मिलिंद हेमराज धापाेडकर (३६, रा. बाजार चाैक, पाटणसावंगी, ता. सावनेर) असे आराेपीचे नाव आहे. तो सात वर्षापासून दारूभट्टी लावून माेहफुलाची दारू काढायचा. त्या दारूची पाटणसावंगी व परिसरातील गावांमध्ये अवैध वाहतूक व विक्री करायचा. पाेलिसांनी वारंवार धाडी टाकून त्याला अटक केली. त्याच्या विराेधात प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला सुधारण्याची संधीही दिली. परंतु, त्याच्या वर्तनात सुधारणा झाली नाही.
परिणामी, त्याच्या विराेधात ‘एमपीडीए’ (महाराष्ट्र झाेपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धाेकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचा सावनेर पाेलिसांनी प्रस्ताव तयार करून पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या माध्यमातून जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे पाठविला. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी प्रस्तावाला मंजुरी देताच सावनेर पाेलिसांनी त्याला गुरुवारी ताब्यात घेत अटक केली आणि त्याची नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.
...
तरुणी व महिलांची छेडखानी
मिलिंद धापाेडकर याच्या वर्तनामुळे काही नागरिकांच्या जीवितास धाेका निर्माण झाला हाेता. त्याच्यामुळे गावातील काही तरुण व्यसनाधीन झाले. त्याच्या वर्तनाचा गावातील तरुणी व महिलांना त्रास व्हायला हाेता. त्यांच्या छेडखानीचे प्रमाण वाढल्याने त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली हाेती.