कुख्यात रंजित सफेलकरच्या श्रीराम सेनेची नोंदणी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 12:23 AM2021-07-01T00:23:12+5:302021-07-01T00:24:01+5:30
Notorious Ranjit Safelkar धर्मादाय आयुक्तांनी कुख्यात रंजित सफेलकरच्या श्रीराम सेनेची नोंदणी रद्द केली आहे. सफेलकर टोळीविरुद्ध खून, अपहरण, हप्ता वसुली, फसवणूक आणि जमीन बळकावण्याचे गुन्हे दाखल आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धर्मादाय आयुक्तांनी कुख्यात रंजित सफेलकरच्या श्रीराम सेनेची नोंदणी रद्द केली आहे. सफेलकर टोळीविरुद्ध खून, अपहरण, हप्ता वसुली, फसवणूक आणि जमीन बळकावण्याचे गुन्हे दाखल आहेत. सफेलकर टोळी तुरुंगात बंद आहे. सफेलकरला नेत्यांचा आश्रय मिळाला होता. तो श्रीराम सेनेच्या माध्यमातून राजकारणात आला होता. सामाजिक क्षेत्रातही तो सक्रिय होत होता. गुन्हे शाखेने मकोकाची कारवाई केल्यामुळे श्रीराम सेनेशी निगडित बहुतांश व्यक्ती भूमिगत झाले होते. पोलिसांनी धर्मादाय आयुक्तांना श्रीराम सेनेची नोंदणी रद्द करण्याची विनंती केली होती. त्यावर धर्मादाय आयुक्तांनी सुनावणी केली. मंगळवारी, २९ जूनला महाराष्ट्र पब्लिक ट्रस्ट अॅक्टनुसार धर्मादाय आयुक्तांनी श्रीराम सेनेची नोंदणी रद्द केली. गुन्हे शाखेने श्रीराम सेनेच्या हालचाली किंवा श्रीराम सेनेच्या नावाखाली वसुली केल्याची माहिती मिळाल्यास तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. गुन्हे शाखेच्या पुढाकारामुळे यापूर्वीच सफेलकरचे कामठी येथील अवैध कार्यालय व लॉन तोडण्यात आले आहे.