आता अन्न व औषध भेसळमुक्त करण्यासाठी विशेष उपक्रम 

By आनंद डेकाटे | Published: August 11, 2023 05:44 PM2023-08-11T17:44:33+5:302023-08-11T17:50:57+5:30

धर्मरावबाबा आत्राम : ‘ईट राईट इनिशिएटिव्ह’मोहीम, प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश 

Now a special initiative to free food and medicine from adulteration | आता अन्न व औषध भेसळमुक्त करण्यासाठी विशेष उपक्रम 

आता अन्न व औषध भेसळमुक्त करण्यासाठी विशेष उपक्रम 

googlenewsNext

नागपूर : अन्न पदार्थांच्या गुणवत्ता वाढीबरोबरच राज्यातील जनतेमध्ये अन्न सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी ‘ईट राईट इनिशिएटिव्ह’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी येथे अधिकाऱ्यांना दिले. तसेच, अन्न व औषध भेसळमुक्त करण्यासाठी विभाग कटीबद्ध असून त्यासाठी काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

शुक्रवारी रविभवन येथे आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली अन्न व औषध प्रशासनाच्या नागपूर व अमरावती विभागाची आढावा बैठक पार पडली. अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यु काळे, औषधे विभागाचे सहआयुक्त व.तु.पवनीकर, सहआयुक्त (अन्न) ए.पी. देशपांडे यांच्यासह विभागातील अन्न व औषधे सहायक आयुक्त, अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध निरिक्षक उपस्थित होते. 

राज्यातील अन्न सुरक्षा कार्यप्रणाली बळकट करण्याकरिता राज्य व केंद्र शासनामध्ये झालेल्या करारानुसार राज्यात वर्ष २०२३-२४ दरम्यान ‘ईट राईट इनिशिएटिव्ह’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत क्लीन स्ट्रीट फुड हब, क्लीन अँड फ्रेश फुड अँड व्हेजीटेबल मार्केट, ईट राईट स्कूल, ईट राईट कॅम्पस, हायजिन रेटिंग, फोस्टॅक ट्रेनिंग आदीचा समावेश आहे. या माध्यमातून अन्न पदार्थांची गुणवत्ता वाढीसह जनतेमध्ये अन्न सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात येत आहे. नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश  आत्राम यांनी या बैठकीत दिले. यासाठी उद्दिष्टांचा इष्टांक देण्यात आला असून उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना गौरविण्यात येणार आहे. 

भेसळमुक्त अन्न व औषध मोहीमेसाठी अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करुन काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी त्यांनी विभागातील सर्व जिल्ह्यांच्या अडचणी व मागण्या समजून घेतल्या. अभिमन्यु काळे यांनी अधिकाऱ्यांना विविध विषयांवर सूचना केल्या. व.तु.पवनीकर यांनी सादरीकरण केले. बैठकीनंतर आत्राम यांनी अन्न व औषध विभगातर्फे नागपूर व अमरावती विभागातील औषध विक्रेत्यांवर करण्यात आलेल्या कार्यवाहीवर अपीलाची सुनावणी घेतली.

Web Title: Now a special initiative to free food and medicine from adulteration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.