आता मनपामध्ये हात धुतल्यानंतरच प्रवेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 12:46 AM2020-03-25T00:46:27+5:302020-03-25T00:47:41+5:30

'कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आता नागपूर महापालिका मुख्यालयात हात धुतल्यानंतरच प्रवेश करता येणार आहे.

Now access only after washing hands in the NMC | आता मनपामध्ये हात धुतल्यानंतरच प्रवेश 

आता मनपामध्ये हात धुतल्यानंतरच प्रवेश 

Next
ठळक मुद्देलॉकडाऊन लोकांच्याच आरोग्यासाठी : मुंढे यांचे नागरिकांना ३१ मार्चपर्यंत घराबाहेर न पडण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : 'कोरोना'चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने आता नागपूर महापालिका मुख्यालयात हात धुतल्यानंतरच प्रवेश करता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीपुढे हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी तुकाराम मुंढे यांनी स्वत: प्रवेशद्वारावर हात धुऊन कार्यालयात प्रवेश केला. स्वच्छता हाच 'कोरोना'पासून बचावाचा उत्तम उपाय आहे. प्रत्येकाने कोणत्याही व्यक्ती अथवा वस्तूंच्या संपर्कात आल्यास हात धुणे अत्यावश्यक आहे. मनपामध्ये येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांनाही सवय लागावी या हेतूने प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ हात धुण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे हॅण्डवॉश किंवा साबणाने हात स्वच्छ धुऊनच कार्यालयात प्रवेश करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या हेतूने व लोकांच्याच आरोग्यासाठी लॉकडाऊ नचा निर्णय घेतला आहे. ३१ मार्चपर्यंत नागरिकांनी घराबाहेर पडू नये. औषधे, भाजीपाला वा जीवनावश्यक वस्तूंसाठी घरातील एकाच व्यक्तीने बाहेर पडावे, असे आवाहन आयुक्त मुंढे यांनी केले आहे. लॉकडाऊ नदरम्यान जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अनावश्यक गर्दी करू नका. वस्तू वा औषधे खरेदी करताना दोन व्यक्तींमध्ये पाच फुटाचे अंतर राहील याची खबरदारी घ्या. कुणालाही काही अचडण असल्यास वा सूचना करावयाची असल्यास महापालिके च्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा, असे आवाहन तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी मनपाची यंत्रणा सज्ज आहे. कोरोनाला घाबरू नका, सतर्क राहा. हस्तांदोलन टाळा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा, असे आवाहन केले आहे.

मनपाचा नियंत्रण कक्ष कार्यरत
मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. येथे २४ तास कोरोनासंदर्भात माहिती देणारे डॉक्टर उपस्थित राहतील. संबंधितांना शंकांचे समाधान या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून करता येईल. यासोबतच कोरोनासंदर्भात कुणी रुग्ण आपल्या निदर्शनास येत असेल तर त्याबाबतही या नियंत्रण कक्षाला माहिती देता येईल.

Web Title: Now access only after washing hands in the NMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.