आता मोसंबीच्या झाडाचीही चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:13 AM2021-09-09T04:13:11+5:302021-09-09T04:13:11+5:30

काटोल : काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा-मोसंबी उत्पादक शेतकरी फळगळतीने त्रस्त आहेत. मात्र काटोल तालुक्यातील पानवाडी येथे शेतातून मोसंबीची झाडे चोरी ...

Now also the theft of the citrus tree | आता मोसंबीच्या झाडाचीही चोरी

आता मोसंबीच्या झाडाचीही चोरी

Next

काटोल : काटोल-नरखेड तालुक्यातील संत्रा-मोसंबी उत्पादक शेतकरी फळगळतीने त्रस्त आहेत. मात्र काटोल तालुक्यातील पानवाडी येथे शेतातून मोसंबीची झाडे चोरी गेल्याने शेतकऱ्यात चिंतेचे वातावरण आहे. पानवाडी शिवारात सोमेश्वर मुरोडिया यांचे शेत आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी शेतात मोसंबीची ५०० झाडे लावली होती. या झाड्यांच्या संगोपनावर मुरोडिया अधिक मेहनत घेत आहेत. त्यामुळे या झाडांची गुणवत्ता चांगली आहे. अज्ञात इसमाची यावर नजर असल्याने त्याने ३२ झाडे मुळासहित उपटून चोरून नेली आहेत. बुधवारी दुपारी मुरोडिया शेतात गेले असताना त्यांच्या लक्षात ही बाब आली. काटोल-नरखेड तालुक्यात संत्रा-मोसंबी चोरीच्या घटना नव्या नाहीत. मात्र आता झाडेही चोरी जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

080921\1924-img-20210908-wa0120.jpg~080921\img-20210908-wa0122.jpg

शेतातून मोसंबी झाडाची चोरी झाल्याचे दाखवताना शेतकरी~चोरीला गेलेले झाडाची जागा दाखवताना शेतकरी

Web Title: Now also the theft of the citrus tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.