यापुढे दीक्षांत समारंभा समारंभाला लाभणार मराठमोळा साज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2022 10:56 AM2022-05-25T10:56:55+5:302022-05-25T11:05:19+5:30

राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शासकीय तंत्रनिकेतन स्वायत्त संस्थेचा २४ वा पदविका प्रदान समारंभ त्यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला.

Now Convocation Ceremonies Will Be Held In Traditional Marathi Style says Uday Samant | यापुढे दीक्षांत समारंभा समारंभाला लाभणार मराठमोळा साज

यापुढे दीक्षांत समारंभा समारंभाला लाभणार मराठमोळा साज

Next
ठळक मुद्देउदय सामंत : शासकीय तंत्रनिकेतन स्वायत्त संस्थेत २४ वा पदविका प्रदान समारंभ

नागपूर : दीक्षांत समारंभाचे स्वरूप इंग्रजांच्या काळापासून आजही तसेच कायम आहे. यापुढे बदलवून ते मराठमोळ्या पद्धतीने आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीउदय सामंत यांनी दिले.

राजनगर येथील राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शासकीय तंत्रनिकेतन स्वायत्त संस्थेचा २४ वा पदविका प्रदान समारंभ त्यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडला. प्राचार्य तथा नियामक मंडळाचे सदस्य सचिव डॉ. मनोज डायगव्हाणे, नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजचे संचालक राजेश चौधरी, निकेतनचे सहसंचालक डॉ. दत्तात्रय जाधव, परीक्षा नियंत्रक डॉ. एस. बारस्कर आदी उपस्थित होते.

पदविका प्रदान समारंभात विद्यार्थ्यांना करिअरबाबत मार्गदर्शन मिळण्यासाठी उद्योग, स्वयंरोजगार, शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ, नामांकित कंपन्यांचे व्यावसायिक यांना आमंत्रित करण्यात येईल. विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा लाभ होईल. अनुभवाची शिदोरी विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांमार्फत मिळेल, असा विश्वास सामंत यांनी यावेळी व्यक्त केला.

कोरोनाच्या काळात ऑनलाइन परीक्षा ही गरज होती. आता ऑफलाइन परीक्षा पद्धती स्वीकार करणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

प्राचार्य डायगव्हाणे यांनी यावेळी संस्थेची माहिती दिली. पदविका प्रदान सोहळ्यापूर्वी तंत्रनिकेतनच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. पाहुण्यांच्या उपस्थितीत नागपूर शासकीय तंत्रनिकेतन व नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, ट्रॅव्हर्ल्स अँड टुरिझम आदी विद्याशाखेत पदविका प्राप्त करणाऱ्या प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविलेल्या पदविकाधारकांना पदक, प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.

संचालन अधिव्याख्याता मेघा मचाले यांनी केले. आभार एम. व्ही. सरोदे यांनी मानले. शासकीय तंत्रनिकेतनच्या विविध विद्या शाखेचे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Now Convocation Ceremonies Will Be Held In Traditional Marathi Style says Uday Samant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.