आता शेतकऱ्यांनाही वीज कपातीचा शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:09 AM2021-09-18T04:09:20+5:302021-09-18T04:09:20+5:30

२१९ शेतकऱ्यांचे कनेक्शन कापले कमल शर्मा, नागपूर : वीज बिल थकीत असलेल्या घरगुती ग्राहकांचे कनेक्शन मोठ्या प्रमाणावर कापत असलेल्या ...

Now even the farmers are shocked by the power cut | आता शेतकऱ्यांनाही वीज कपातीचा शॉक

आता शेतकऱ्यांनाही वीज कपातीचा शॉक

googlenewsNext

२१९ शेतकऱ्यांचे कनेक्शन कापले

कमल शर्मा,

नागपूर : वीज बिल थकीत असलेल्या घरगुती ग्राहकांचे कनेक्शन मोठ्या प्रमाणावर कापत असलेल्या महावितरणने आता शेतकऱ्यांचे कनेक्शन कापनेही सुरू केले आहे. अतिशय गोपनीय पद्धतीने थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. एकट्या नागपूर ग्रामीण सर्कलमध्येच आतापर्यंत २१९ शेतकऱ्यांची वीज कापण्यात आली आहे.

महावितरणने घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना आधी निशाण्यावर घेतले. थकबाकीदारांची वीज जाेरात कापली जात आहे. शेतकऱ्यांना या कारवाईपासून दूर ठेवण्यात आले होते. २०१४ मध्ये तत्कालीन सरकारने थकबाकीदारांचे कनेक्शन कापण्यावर बंदी घातली होती. महाविकास आघाडीने या धोरणावर चालत थकबाकीदार शेतकऱ्यांना थकबाकीतून मुक्त करण्यासाठी कृषी पंप धाोरण जाहीर केले. यासाठी शेतकऱ्यांना मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रक्कम भरायची आहे. या दरम्यान महावितरणने थकबाकीदार शेतकऱ्यांची वीज कापणे सुरू केले आहे.

नागपूर जिल्ह्यात जुलै महिन्यात ५७, ऑगस्ट महिन्यात २१९ वीज कनेक्शन कापण्यात आले. सुरू बिल न भरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास एक लाख कृषी पंपाचे कनेक्शन आहेत. यापैकी ९५ टक्के शेतकऱ्यांचे चालू बिल थकीत असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत महावितरणने कारवाई तीव्र केली तर खरीपमध्ये बहुतांश शेतकरी विजेविनाच राहतील.

-------------

बॉक्स

जिल्ह्यातील कारवाई

डिव्हीजन ग्राहकांची संख्या कापलेले कनेक्शन

काटोल - २९,२५४- ३०

मौदा - १३,९१५-६७

सावनेर- १९,२६७-२८

उमरेड - १९,२८७- ९४

एकूण - ८१,७२३ - २१९

-------------------

बॉक्स

चालू बिल न भरल्याने कारवाई

महावितरणचे अधिकारी यासंदर्भात काहीही बोलायला तयार नाहीत; परंतु नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी माहिती दिली की, मुख्यालयाच्या निर्देशानुसारच कारवाई केली जात आहे. चालू बिल न भरल्यामुळे कारवाई केली जात आहे.

Web Title: Now even the farmers are shocked by the power cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.