आता लक्ष मेट्रो रिजन

By admin | Published: March 8, 2017 02:31 AM2017-03-08T02:31:21+5:302017-03-08T02:31:21+5:30

नागपूर सुधार प्रन्यासच्या (नासुप्र) बरखास्तीची घोषणा झाली आहे. डिसेंबर २०१७ पर्यत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

Now focus on the metro area | आता लक्ष मेट्रो रिजन

आता लक्ष मेट्रो रिजन

Next

नासुप्रचा ९५७. ११ कोटींचा अर्थसंकल्प : सिमेंट रस्ते, मेट्रो रेल्वे, आवास योजनेला बळ
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासच्या (नासुप्र) बरखास्तीची घोषणा झाली आहे. डिसेंबर २०१७ पर्यत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. नासुप्रवर नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) जबाबदारी सोपविली जाणार आहे. या पार्श्वभूमिवर भविष्यातील दायित्वाचा विचार करता सभापती दीपक म्हैसेकर यांनी मंगळवारी २०१७-१८ या वर्षाचा नासुप्रचा अखेरचा ९५७ कोटी ११ लाखांचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नासुप्रने आता आपले लक्ष मेट्रो रिजनवर केंद्रित केल्याचे संकेत दिले आहे.

अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार ९ कोटी ८० लाखांची सुरुवातीची शिल्लक गृहीत धरून एकू ण ९५९ कोटी ४० लक्ष अपेक्षित आहे. यात भांडवली जमा ५४१ कोटी ९९ लाख, महसुली जमा ३४६ कोटी ३६ लाख आणि अग्रीम व ठेवी जमा रुपये ६१ कोटी २५ लाखांचा समावेश आहे. नासुप्रने पुढील वित्तीय वर्षात भांडवली खर्च ७६५ कोटी ८३ लाख, महसुली खर्च १४० कोटी ५३ लाख आणि अग्रीम व ठेवी खर्च ५० कोटी ७५ लाख असे ९५७ कोटी ११ लाख विकास कामांवर खर्च करण्याचे नियोजन केले आहे.
एनएमआरडीएचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या क्षेत्रांतर्गत ७१९ गावांतील ३५६७ चौ.कि.मी. क्षेत्रात नवीन उद्योगांना चालना देणारा, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून पर्यावरणाचा समतोल राखणारा प्रारूप विकास आराखडा नासुप्रने शासनाला सादर केला आहे. या भागाच्या विकासासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. नागपूर शहरातील गुंठेवारी कायद्यांतर्गत नासुप्रने १३२ कोटींची कामे पूर्ण केली आहे. उर्वरित कामांसाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
दलित वस्ती सुधार योजना, आमदार निधी, खासदार निधी व महापालिका क्षेत्रात मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ३८ कोटी, सिमेंट रस्त्यांसाठी नासुप्रचा वाटा म्हणून ४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी नासुप्रने ९९५ कोटी ५९ लाखांंचा अर्थसंकल्प सादर केला होता. परंतु अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ४१३ कोटी कमी आले. त्यामुळे विकास कामांवर ४२१ कोटी खर्च करता आले. त्यामुळे अर्थसंक ल्पात अपेक्षित महसूल जमा होण्याची शक्यता कमीच आहे.

 

Web Title: Now focus on the metro area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.